श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-17

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:40:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

=========================================
"कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे"
"गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!"

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा...

हे आला रे आला गोविंदा आला...
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा...
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

     तुम्हाला हे जन्माष्टमी शुभेच्छा मराठी मध्ये (Janmashtami messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Wishes in Marathi इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल marathivarsa@gmail.com वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

--by Marathi Varsa Team
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================