दिन-विशेष-लेख-वेद दिन-C

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 03:03:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                       "वेद दिन"
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-07.09.2023-गुरुवार आहे.  0७ सप्टेंबर-हा दिवस "वेद दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                 वेदांची माहिती --

     नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जगातील पहिला धर्म जंताचे माहिती सांगणार आहोत. म्हणजेच वेदांची माहिती ( Ved in Marathi । वेदांची माहिती मराठी । Ved Information in Marathi) सांगणार आहोत.

            वेदांची माहिती मराठी :--

1. ऋग्वेद :
2. यजुर्वेद :
3. सामवेद :
4. अथर्वदेव :

     मित्रांनो हिंदु धर्मामध्ये वेदांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.वेद हा जगातील पहिला धर्मग्रंथ आहे. याच आधारावर जगातील इतर धर्मांचा जन्म झाला, ज्यांनी वेदांच्या ज्ञानाचा वेगवेगळ्या भाषांमध्ये आपापल्या पद्धतीने प्रचार केला. वेद हा देवाने ऋषीमुनींना सांगितलेल्या ज्ञानावर आधारित आहे, म्हणून त्याला श्रुती म्हणतात.

     सामान्य भाषेत वेद म्हणजे "ज्ञान". सामान्यता वेदांचे चार प्रकार पडतात. या चार प्रकारांमधून आपल्याला सर्व प्रकारच्या ज्ञानाचा भांडार सांगितला जातो त्यामधून मनुष्याच्या प्रत्येक समस्या वर उपाय सांगण्यात आलेला आहे. वेद हे प्राचीन ज्ञान विज्ञानाचे अक्षय भांडार आहेत. ब्रह्मा (देव), देवता, विश्व, ज्योतिष, गणित, रसायने, वैद्यकशास्त्र, निसर्ग, खगोलशास्त्र, भूगोल, धार्मिक नियम, इतिहास, चालीरीती इत्यादींसारख्या जवळजवळ सर्वच विषयांशी संबंधित वेद ज्ञानाने परिपूर्ण आहेत.

     वेदामध्ये आपल्याला कोणत्याही विषयाच्या ज्ञानाबद्दल माहिती सहजरीत्या प्राप्त होते म्हणून हिंदू धर्मामध्ये विधानाला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते व हिंदू धर्म हा देखील वेदांच्या चा आधारे चालत आहे.

     शतपथ ब्राह्मण श्लोकानुसार अग्नि, वायु, आदित्य आणि अंगिरा यांनी तपश्चर्या करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद प्राप्त केले. पहिले तीन वेद अग्नि, वायु, सूर्य (आदित्य) यांच्याशी संबंधित आहेत आणि शक्यतो अथर्वदेवाची उत्पत्ती अंगिरापासून झाली असे मानले जाते. एका ग्रंथानुसार ब्रह्माजींच्या चार मुखातून वेदांची उत्पत्ती झाली. आजही रामायण, महाभारत इत्यादी शब्दांवरून लोक आणि ठिकाणे इत्यादींची नावे ठेवली जातात.

     वेद हे सर्व प्राचीन ग्रंथांपैकी सर्वात जुना आणि धार्मिक ग्रंथ आहे इतर सर्व धार्मिक ग्रंथाची निर्मिती देखील वेदांच्या आधारावर झालेली आहे.

     वेद हे मानवी सभ्यतेचे जवळजवळ सर्वात जुने लिखित दस्तऐवज आहेत.

--by Marathi Read
---------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी रीड.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार.
=========================================