गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-3

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:07:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

        गोपाळकाला संपूर्ण माहिती : Gopalkala Information--

=========================================
गोपाळकाला माहिती धार्मिक--
सणाचे नाव-गोपाळकाला
समर्पित-भगवान कृष्ण
दुसरे नाव-दहीहंडी
मराठी महिना-श्रावण
इंग्रजी महिना-ऑगस्ट / सप्टेंबर
=========================================

            प्रस्तावना (Introduction Of Govinda Festival 2023)--

     "गोविंदा आला रे आला" या गाण्याने अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जाणारा सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गोपाळकाला आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा गोपाळकाला सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या गोपाळकालेचे महत्व, तसेच या दिवशी काय केले जाते?याबाबतची सगळी माहिती आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया गोपाळकाला सणाची माहिती.

           गोपाळकाला २०२३ अर्थ – (Meaning Of Gopalkala)--

     कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे गोपाळकाला. गोपाळ हे एक कृष्णाचे नाव आहे.आणि काला म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणे. कृष्णाला आवडणाऱ्या दूध, दही, लोणी, आणि इतर पदार्थांपासून बनवला जाणारा एक पदार्थ म्हणजे काला. म्हणून याला "गोपाळकाला" असे म्हणतात.

--by Team MarathiZatka
---------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================