गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-4

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:09:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

              दहीहंडी का साजरी केली जाते?--

     भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण खूपच नटखट आणि खोडकर असा होता. राजपुत्र असूनही गावातील लोकांच्या घरातील लोणी चोरून खाणे, त्याला फार आवडायचे. त्याच्या या नटखट स्वभावामुळे गावातील गोप, गोपिका त्याची आई यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे. पण तरीही कधीही कृष्णाने त्यांच्याकडील लोणी खाल्ले नाही तर सर्वजण अस्वस्थ देखील व्हायचे. अनेकदा गावातील लोक लोणी लपवून एका मडक्यात बांधून वर ठेवीत. परंतु हे मडके फोडण्यासाठी कृष्ण आपल्या मित्रांची मदत घेत असे आणि त्यात ठेवलेले लोणी दही फस्त करीत असे. त्याच्या या बाललीलांचे प्रतीक म्हणून आपण गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा करतो.

            दहीहंडी कधी साजरी केली जाते?--

     गोपाळकाला हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण भगवान कृष्णाला समर्पित आहे. भारतातील अनेक भक्त समुदाय कृष्णाला आपल्या आराध्य दैवत म्हणतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये गोपाळकालाच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. उत्सवासाठी लाखोंची बक्षीस हे देखील ठेवली जातात. या उत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होत असतात. म्हणून या सणाला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे.

            दहीहंडी उत्सव कसा साजरा करतो?--

     गोपाळकाला म्हटले की, आपल्याला आठवतात ते मोठ मोठे दहीहंडीचे थर. ही दहीहंडी साजरी करणारे तसेच विश्वविक्रम करणारी गोविंदा पथके देखील आपल्याकडे आहे. ज्यांची आतुरता संपूर्ण जगाला लागून राहिलेली असते. खासकरून मुंबईमध्ये या दहीहंडी उत्सवाला परदेशातून पाहुणे येत असतात. या दहीहंडी उत्सवासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात.

     तसेच या उत्सवामध्ये अनेक सेलिब्रेटी कलाकार देखील सहभागी होत असतात. या दहीहंडीच्या आठ ते नऊ थरासाठी गोविंदा पथके क्रित्येक महिने आधी सराव करत असतात. सर्व जाती, धर्म, भाषा विसरून आपण या सणाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो.

         गोपाळकाला / दहीहंडी महत्त्व – (Importance Of Gopalkala 2023/ Dahi Handi)--

     या दिवशी दही, लोणी आणि इतर पदार्थ घालून भरलेली हंडी फोडून तो प्रसाद खाण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे. अनेक पथके जमलेली असतात. जास्तीत जास्त थरावर कमीत कमी वेळेत ही हंडी गोविंदा पथक फोडतो. त्याला योग्य बक्षीस दिली जातात. हा उत्सव संपूर्ण देशभर अतिशय मनोरंजक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून या सणाला अतिशय महत्त्व आहे.

             दहीहंडीचे सांस्कृतिक महत्त्व –

     धार्मिक रित्या जसे महत्व आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये हा सण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमच बनलेला आहे. विविध धर्मातील, जातीतील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामुळे सामाजिक एकोपा तयार होतो. गोविंदा पथकांमध्ये देखील विविध समुदायातील व्यक्तींचा या ठिकाणी समावेश दिसून येतो. हा सण केवळ सहभागी आणि प्रेक्षकांपुरता मर्यादित नसून यामध्ये अनेक व्यावसायिक तसेच सरकारी लोक देखील यामध्ये सहभागी होतात. आपल्या कंपन्यांमार्फत गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवून आपला सहभाग दर्शवतात.

--by Team MarathiZatka
---------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================