गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-6

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:16:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

              मंत्र--

"ॐ देविकानन्दनाय विधमहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात"
"ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा"
"ॐ देविकानन्दनाय विधमहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात"

              गोपाळकाला कथा – Gopalkala Story--

     कृष्ण त्याच्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत यमुना नदीच्या काठी गुरे, वासरे चरायला घेऊन जात असे. सकाळपासून ते अगदी दुपारपर्यंत गुरे वासरे चरल्यानंतर दुपारच्या वेळी कृष्ण आणि त्याचे सवंगडी काही खेळ खेळत असत. खेळ खेळून दमल्यावर एकत्र जमत असत. त्याचे सवंगडी हे सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या घरून येणारे जे पदार्थ होते ते अगदी साधी असायचे. कोणी नुसता भात आणायचे, तर कोणी नुसती चटणी, भाकरी आणत असे. तर कोणी ताक आणायचे.

     कृष्णाचे मित्र हे कृष्णा पेक्षाही अतिशय गरीब होते. अशावेळी कृष्णाला वाटे की, माझे मित्र साधे जेवण जेवतात आणि त्यांच्यासमोर मी पक्वान्नाचे जेवण कसे जेवायचे? त्यामुळे श्रीकृष्ण सगळ्यांना एकत्र बोलावून मोठा घोळका करत. सर्वजण मिळून गोलाकार बसत. आणि त्यानंतर कृष्णाने आणलेले पदार्थ तो आपल्या पोतडीतून बाहेर काढीत असे. त्याचबरोबर मित्रांनी आणलेले जे काही इतर पदार्थ असतील ते काढून सर्व एकमेकांमध्ये मिसळत असत. हाच तो काला. म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा गोपाळकाला आपण भगवान श्रीकृष्णाच्या आठवणीने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

--by Team MarathiZatka
---------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================