गोपाळ-कIला(दहीहंडी)-माहिती-7

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:17:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला संपूर्ण माहिती. 

             दहीहंडी कथा – Dahi Handi Story--

     कृष्ण हा लहानपणी अतिशय खोडकर मस्तीखोर मुलगा होता. त्याला दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडायचे आणि तो राहायचा त्या गावात गाई, गुरे पाळणारा गवळी समाज होता. त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये दूध, दही, लोणी यांची कमतरता भासत नव्हती. कृष्ण आपल्या घरी दूध, लोणी चोरून तर खायचाय, परंतु दुपारच्या वेळी गावातील लोक झोपलेले असताना किंवा शेतामध्ये कामाला गेलेले असताना तो कोणाच्याही घरी हळूच जाऊन दही, दूध, लोणी यापैकी जे मिळेल ते काढून खायचा. त्यामुळे त्या गावातील बायका दही, दुधा, लोण्याचे मडके वर बांधून ठेवत असत. त्यामुळे कृष्णा आणि त्याचे सवंगडी एक गोल करत आणि कोणाला तरी एकाला वरती उभे करून तो दह्या, दुधाचा माठ काढायला लावत असत.

     कधी कधी तर माठाला हात पोहोचायचा, पण काढता येणे शक्य नसायचे. त्यामुळे सर्वांच्या खांद्यांवर चढलेला सर्वात वरचा सवंगडी तो मडके फोडायचा आणि त्यामुळे दही, लोणी यासारखे पदार्थ बाहेर पडायचे. ते दही कोणाच्या अंग खांद्यावर पडत असायचे आणि त्यानंतर हे अंगावर पडलेले दही ते हाताने खात असायचे. अशा प्रकारे मडके फोडून दही, दूध, लोण्याची चोरी करायचे याची आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो.

          भारतात कुठे कुठे गोपाळकाला साजरा केला जातो?--

वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तिने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलिलाचे सादरिकरण केले जाते.

ओरीसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहिभंगा जत्रा साजरी केली जाते.

गुजराथमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

भारताच्या विविध प्रांतात विविध पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात दहिहंडी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृदांवन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णीमान्त महिना असलेले पंचाग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृदांवनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो.

             या उत्सवाचे साधारण स्वरूप पुढील प्रमाणे –

कृष्णजन्माच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळणा सजवून रांगत्या श्रीकृष्णाची साग्रसंगीत पूजा केली जाते, भजन, किर्तन आणि प्रसाद वाटून कृष्णजन्म साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, दहिहंडी साजरी करून उत्सव केला जातो.

विशेष गोष्ट ही की, भारताच्या बाहेरील काही देशही हा उत्सव साजरा करताना दिसतात.

बांग्लादेश येथेही हा उत्सव साजरा करण्यात येतो. या देशातील ढाकेश्वरी मंदिरापासून एक यात्रा काढली जात असे.

नेपाळ सारखे हिंदू राष्ट्र हा उत्सव साजरा करतो.रात्री पर्यंत उपवास करून जन्माष्टमी साजरी केली जाते. भक्त भगवत गीतेचा अध्याय वाचतात, पुजा करतात, भजनं म्हणतात. कृष्णाच्या मंदिराला सजवले जाते.

याशिवाय फिजी या देशातही कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते.

--by Team MarathiZatka
---------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================