गोपाळ-कIला(दहीहंडी)-निबंध-1

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:28:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी वर्णनात्मक निबंध. 

       मी पाहिलेली दहीहंडी - Mi Pahileli Dahihandi Marathi Nibandh - Dahihandi Essay In Marathi--

     मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेली दहीहंडी हया विषयावर वर्णनात्मक निबंध बघणार आहोत.

     कालच गोकुळाष्टमीचा दिवस होऊन गेला. गोकुळाष्टमीच्या दिवसाला दहीहंडी हा सण साजरा करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुरु आहे. शाळेला गोकुळाष्टमीनिम्मित सुट्टी जाहीर झालीच होती मग काय आम्ही सगळे बच्चे मंडळी सकाळी लवकर उठून आमच्या बिल्डिंगच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या दहीहंडीच्या दिशेने रवाना झालो.

     आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक मोठी अशी दहीहंडी लावण्यात आलेली होती. जवळपास पाच ते सहा मानवी थर तर नक्कीच ही हंडी फोडण्यासाठी लागणार होते हे तिच्या उंचीकडे पाहूनच सर्वांच्या लक्षात आले होते.

     आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरे करण्याची प्रथा आहेच परंतु त्यातील काही सण म्हणजेच गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि मुख्यतः दहीहंडी या सणाचा जोश आणि आतुरता अबाल वृद्धापासून सर्वांनाच असते आणि त्या एका दिवसासाठी ती हंडी फोडण्यासाठी केला जाणारा जो सराव असतो त्याची तयारी तर प्रत्येक गोविंदा पथक जवळपास एक एक महिना आधीपासूनच करीत असतात.

     प्रत्येक जण दिवसभर आपापला कामधंदा सांभाळून मग संद्याकाळी दहीहंडी फोडण्याच्या थरासाठी लागणाऱ्या सरावाला नियमित हजेरी लावतात जेणेकरून आपापल्या पथकातील गोविंदा हे एकावर एक मानवी थर लावण्यात सराईत होऊ शकतील. या प्रत्येक गोविंदा पथकात विशेष लक्षवेधी बाब असते ती म्हणजेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार लहान गोविंदा.

     आमच्या बिल्डिंगची दहीहंडी दुपारपर्यंत बांधून पूर्ण झाली होती आणि मग आतुररता होती की कोणत्या गोविंदा पथकाकडून ही मानाची हंडी फोडण्यात येईल याची. दहीहंडीचा दिवस सुरु झाला आणि सकाळपासून दहीहंडीची गाणी येणाऱ्या गोविंदामध्ये जोश आणण्यासाठी लाउस्पीकरवर लावण्यात आली होती. आम्हा सर्व लहान मुलांना तर हया जल्लोष्याच्या वातावरणात खूपच मज्जा येत होती.

     हळू हळू जशी संद्याकाळ होऊ लागली तस तसे एक एक गोविंदा पथक आमच्या दहीहंडीजवळ पोहचू लागले. त्यातील अनेक गोविंदा हे मोठमोठ्या ट्रक मधून, बसेस मधून व काही गोविंदा तर मोटारसायकल वरून ही येताना दिसले आणि सुरु झाली ती एकावर एक मानवी मनोरे रचण्याची कसरत.

     जस जसे ते गोविंदा एकावर एक मानवी मनोरे रचत वर वर उंचावर चढत होते तस तसे ही दहीहंडी बघणाऱ्या आलेल्या प्रेक्षकांच्या उत्सहात भर पडीत होती. एक पथक, दुसरे पथक, तिसरे पथक आले आणि त्या मनाच्या दहीहंडीला फक्त सलामी देऊन निघून गेले.

     दहीहंडी फारच उंचावर बांधली गेली असल्यामुळे बहुतेक गोविंदा पथक हे फक्त थर लावून हंडीला सलामी देत निघून जात होते. हळू हळू सद्याकाळचे सात - साडेसात वाजत आले. आता मात्र दहीहंडी फोडताना बघण्यासाठी जमलेल्या लोकांची गर्दी ही खूपच वाढू लागली होती. येणा - जाणाऱ्या गोविंदा पथकांचे धैर्य वाढविण्यासाठी व त्याच्यातील ऊर्जा टिकावून ठेवण्यासाठी सतत दहीहंडीची गाणी सुरु होती.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सोपेनिबंध.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================