गोपाळ-कIला(दहीहंडी)-निबंध-4

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:31:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोपाळकाला निबंध. 

             श्रीकृष्णाचा जन्म केव्हा झाला?--

     भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात होतो. श्रावण वद्य अष्टमी, नक्षत्र रोहिणी, चंद्र वृषभ राशीत असतांना श्रीकृष्णाचा जन्म होतो. श्रीकृष्णाच्या जन्माने सर्वत्र अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. कंसासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झालेला असतो.

     वसुदेव आणि देवकी यांचा हा सुपुत्र मात्र मथुरेत राहत नाही. श्रीकृष्णाचे वडील वसुदेव बाळकृष्णाला गोकुळाच्या नंदाघरी रातोरात नेऊन ठेवतात. तिथेच श्रीकृष्ण लहानाचा मोठा होतो. नंदपत्नी यशोदा माता श्रीकृष्णाचे सर्व लाड पुरवतात. श्रीकृष्णाच्या सर्व बाललीला गोकुळामध्ये घडत असतात.

     श्रीकृष्णाला वाटे की ज्या कंसाचा वध करण्यासाठी माझा जन्म झाला त्याच्या मथुरेत हे पदार्थ जाऊ नयेत. आपल्या गोकुळातील सवंगड्यांना हे पदार्थ खायला मिळावेत. श्रीकृष्णाला ते धष्टपुष्ट व्हावेत असे वाटे.श्रीकृष्ण आणि त्याच्या सोबत्यांचे एक मंडळ होते.

     थोडक्यात ते एक गोविंदा मंडळच होते. त्यामुळे श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसमवेत घरांमध्ये गुपचुपपणे शिरून तेथील शिंक्यावरचे दही, दुधाचे माठ काढून किंवा फोडून आपल्या सवंगड्यांना स्वतःच्या हाताने खायला देत असे. श्रीकृष्णालाही दही, दूध,लोणी हे पदार्थ फार आवडत. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीला ऐकल्या, वाचल्या की त्यावेळचे गोकुळातील दही लोणी चोरून खाण्याचे प्रसंग किती छान असतील ते लक्षात येते. हे प्रसंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

              श्रीकृष्णाने गोपाळकाला कसा साजरा केला?--

     एक दिवस काय होते, श्रीकृष्ण आपल्या या सगळ्या सवंगड्यांना आपल्याबरोबर आपापल्या घरातील शिदोरी घेऊन वनात गाई गुरे चारण्यासाठी जातो. दिवसभर त्या ठिकाणी हे बाळगोपाळ अतिशय आनंदाने खेळत असतात. एका बाजूला गाई चरत असतात. दुपारची वेळ होते. सर्व जण भुकावलेले असतात. अशावेळी सर्व बाळ गोपाळ गोलाकार जेवायला बसतात. सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या शिदोरी आणलेले असतात.

--by Tukaram Gaykar
------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्कूलिंगटन.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================