गोपाळ-कIला(दहीहंडी)-कविता-1-दहीहंडी

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:35:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी सणाची कविता. 

                                        "दहीहंडी"
                                       ----------

ही हंडी उभारली ती

श्रीकृष्णांनी त्या काळीही



समाजातील गोरगरीब अन्

श्रीमंतांच्या एकतेचीही

आज बांधतो दहीहंडीच आपण



उत्साह अन् पैशाची

माणसांच्याच मनोर्‍यागत

वाढणार्‍या त्या सर्व स्वप्नाची

दहीहंडी करून देते

आठवण सदा श्रीकृष्णांची



सांगितलेल्या तत्वज्ञानपर

ज्ञानियांच्या त्या गीतेची

दहीहंडी मुहर्त शुभ तो

फुटण्या हंडी दांभिकतेची



समाजात ह्या वाढणार्‍याच

सतत वाईट प्रवृत्तींची

दहीहंडी बांधावी तर

संस्कृती अन् संस्काराची



पोहचावया जिच्यापर्यंत

तरूणांचीच झुंबड व्हावी

--निलेश बामणे
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरीमिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================