गोपाळ-कIला(दहीहंडी)-दहीहंडी सणाची गIणी-3

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:44:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडी सणाची गIणी. 

             Mitra Song Lyrics – Kanha--

हाथ दे साथ दे आभाळाला बांधलाय दोर
देवा धाव रे पाव रे देवा येडी झालीत पोर
हार हो जीत हो काही भी होऊ दे आता
यार हो दोस्त हो थरावरती चढवा थर,

कधी हातात हात
कधी पायात पाय
खांदावर घेणार
पण डोकावर नाय,

जा वेशीवर टांग दुनियादारी
लै मीठी छुरी आपली यारी
चल खुनस दाखव, लढ मित्रा
पण आसते आसते चढ मित्रा

गोविंदा गोपाला कान्हा मुरारी
एकाच देवाची रूप ही सारी
एकाच नाण्याच्या बाजू दोन
बघ हला हाय कोन अन भारी कोन,

आभाळाचा पोटातली ती काना हंडी फोड
जमिनीवर बघ पाय माझे तू खालची काळजी सोड
जा जिंकून ये जा गड मित्रा
पण आसते आसते चढ मित्रा

लै झाली, बास झाली, तुझी कहाणी
गोविंदा नाय तुझा ढगात पाणी
ढगात नाय पाणी , घागर उताणी
तशात समोर , झाशीची राणी,

निघायचं बघ, फुटायचं बघ
येईल ती गाडी पकड
इथे नको , तिथे नको
आयशीजवळ जाऊन रड

दुपटा ले मेरा , घुंघट ओढ
हवा येऊ दे चल रस्ता सोड
चल खुनस दाखव, लढ मित्रा
पण आसते आसते चढ मित्रा.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगIणी.इन)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================