गोपाळ-कIला(दहीहंडी)-हार्दिक शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 05:54:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. 

       Dahi Handi Wishes-दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा 2023--

=========================================
कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर.

दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

लय झाली "दुनियादारी"
खूप बघितली "लय भारी"
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा...!!

मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर...
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

हे आला रे आला गोविंदा आला...
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा...
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-estartuपीडिया.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================