गोपाळ-कIला(दहीहंडी)-हार्दिक शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 06:03:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. 

     दहीहंडी हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा केला जातो. दहीहंडी दिवशी उंचीवर दोरीच्या साहाय्याने दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात.सार्वजनिक दहीहंडीच्या कार्यक्रमात हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात.परंतु या वर्षी कोरोना संकट पाहता दहीहंडी / गोपालकालाचा कार्यक्रम टाळण्यात येत आहे. परंतु तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मीडियावर दहीहंडी शुभेच्छा मराठी देऊ शकता.

         दहीहंडीच्या शुभेच्छा मराठी / Dahi handi wishes--

=========================================
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
🙏दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा...

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर.

दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--by YourSelfStatus
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-यौरसेल्फस्टेटस.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================