दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन-A

Started by Atul Kaviraje, September 08, 2023, 05:07:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                                "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन"
                               -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-08.09.2023-शुक्रवार आहे.  0८ सप्टेंबर-हा दिवस "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढावी हा, या दिवसाचा उद्देश आहे. दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जातो. शिक्षणाचा प्रचार व्हावा, या उद्देशाने हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

      आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस International Literacy Day Information--

     आजच्या आर्टिकल मध्ये आपण "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस" (International Literacy Day Information In Marathi) का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असे म्हटले जाते.

     सध्या विकसनशील देशांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे समाजामध्ये साक्षरता घडून आणण्यासाठी हा दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आपल्या भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो.

     तसे पाहायला गेले तर आपल्या भारतामध्ये शोधा निरक्षरतेचे प्रमाण खूप अधिक आहे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कितीतरी पट भारतामध्ये निरक्षक लोक राहतात. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे भारताची प्रगती खूपच मागे होत चाललेली आहे. याचे कारण फक्त एकच आहे भारतामध्ये असलेली निरक्षरता जेव्हा भारतीय समाज संपूर्णपणे प्रगत आणि साक्षर होईल तेव्हाच भारताची प्रगती मोठ्याने होईल. आजही भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे फक्त मुलांना शिकवले जाते मुलींना तेवढे महत्त्व दिले जात नाही त्यामुळे भारतातून मुलींची प्रगती विकसित देशांपेक्षा खूप कमी आहे.

     आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021 हा दिवस व्यक्ती, समुदाय आणि समाजांसाठी साक्षरतेचे महत्त्व आणि अधिक साक्षर समाजांकडे तीव्र प्रयत्नांची गरज याबद्दल जागरूकता पसरवितो. लोकांना भेडसावणाऱ्या साहित्यिक समस्यांच्या जगात जागरूकता वाढवणे आणि सर्व लोकांसाठी साक्षरता वाढविण्यास मदत करणाऱ्या मोहिमांना मान्यता देणे आवश्यक आहे.

--by Shrikant
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉर्मेशनमराठी.को.इन)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.09.2023-शुक्रवार.
=========================================