दिन-विशेष-लेख-ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन-B

Started by Atul Kaviraje, September 09, 2023, 05:04:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                            "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन"
                           ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.09.2023-शनिवार आहे.  0९ सप्टेंबर-हा दिवस "ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                  ताजिकिस्तान--

             इतिहास--

     सांप्रतकाळी ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात सुमारे इ.स.पू. ४०००पासून मानवी वसवणुकीच्या खुणा आढळल्या आहेत. या प्रदीर्घ इतिहासात ताजिकिस्तानाच्या भूभागावर अनेक साम्राज्यांची, राज्यांची सत्ता होती. वेदकालीन रचनाकार यास्काच्या (इ.स.पू. ७वे शतक) निरुक्तात काम्बोजातील लोक शावति हे क्रियापद जाणे अश्या अर्थी वापरत असल्याची टिप्पणी आहे. आधुनिक काळीही अमू दर्याच्या काठी व पामीर पर्वतांच्या परिसरात प्रचलित असलेल्या वाल्खी, शिगाली, मुंजानी, याग्नोबी इत्यादी बोल्यांमध्ये प्राचीन काम्बोजी भाषेप्रमाणे शावतिवरून उद्भवलेले शब्द जाणे या अर्थी वापरले जातात. भाषाशास्त्रीय सिद्धान्तांनुसार काम्बोज व परम काम्बोज या वैदिक साहित्यात वर्णिलेल्या प्रदेशांत वर्तमान ताजिकिस्तानाचा अंतर्भाव होत असावा.

     इ.स.पू. ६व्या शतकापासून इ.स.पू. ४थ्या शतकापर्यंत या भूभागावर इराणातल्या हखामनी साम्राज्याचा अंमल होता. पुढे महान अलेक्झांडराने हखामनी साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर ग्रेको-बाख्तरी राज्याच्या उत्तरसीमाप्रदेशात हा भाग मोडला जाऊ लागला. इ.स.पू. ४थ्या शतकाच्या अखेरपासून इ.स.पू. २ऱ्या शतकाच्या आरंभापर्यंत हा भाग बाख्तरी राज्याचा हिस्सा होता. तुखार या शक टोळ्यांनी आक्रमणे करून हा भाग जिंकल्यानंतर तो तुखारिस्तानात गणला जाऊ लागला. इ.स.पू. २ऱ्या शतकात हान राजघराण्याने राजदूत पाठवून चिनी साम्राज्याच्या पश्चिमेस वसलेल्या बाख्तराशी राजनैतिक संबंध जुळवले.

     इ.स.च्या ७व्या शतकात अरबांनी येथे इस्लाम आणला. मात्र अल्पकाळातच अरबांना सारून सामानी साम्राज्याने या भागावर आपली सत्ता स्थापली. सामानी साम्राज्याच्या काळातच समरकंद व बुखारा ही शहरे (ही शहरे सध्या उझबेकिस्तानात मोडतात) भरभराटीस येऊन ताजिक संस्कृतीची प्रमुख केंद्रे बनली. पुढे मंगोलांनी मध्य आशियाचा बह्वंशी प्रदेश पादाक्रांत केला. इ.स.च्या १३व्या शतकापासून १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत मंगोलवंशीयांच्या राज्यांनी येथे सत्ता गाजवली. त्यानंतर सध्या ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात बुखाऱ्याची अमिरात उदयास आली व तिची सत्ता इ.स. १९२०पर्यंत येथे चालली.

     इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरा‍र्धात रशियन साम्राज्याने मध्य आशियात चालवलेल्या साम्राज्यविस्तार मोहिमांत कास्पियन समुद्रापासून अफगाणिस्तानापर्यंतचा तुर्कवंशीयांचे बाहुल्य असलेला मोठा भूप्रदेश बळकावला व त्यांपासून रशियन तुर्कस्तान नावाचा प्रशासकीय विभाग बनवला. इ.स. १९१७ साली बोल्शेविक क्रांतीने रशियन साम्राज्य उलथून टाकल्यानंतरच्या संधिकाळात रशियन तुर्कस्तानातील लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ऊर्मी बळावली. त्यांनी बोल्शेविक राजवटीविरुद्ध गनिमी युद्ध छेडले. गनिमी तंत्राने उठाव करणाऱ्या या बास्माची बंडखोरांनी सुमारे चार वर्षे लढा दिला; मात्र अंतिमतः लाल सैन्याची सरशी झाली. इ.स. १९२९ साली सोव्हिएत संघांतर्गत ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाची निर्मिती करण्यात आली. इ.स. ११९१ साली सोव्हिएत संघ कोसळल्यावर ताजिकिस्तानाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2023-शनिवार.
=========================================