विरह कविता-प्रिया, तू चोरी केलंस माझं मन,तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन-B

Started by Atul Kaviraje, September 10, 2023, 10:28:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, एक विरह कविता-गीत ऐकवितो. "दीवाना प्यार तेरा, दिल मेरा चुराने लगा, रातों को जगाने लगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पावसाने विश्रांती घेतलेली, आणि छान, साफ, स्वच्छ, चमकदIर ऊन पडलेली, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( दीवाना प्यार तेरा, दिल मेरा चुराने लगा, रातों को जगाने लगा )
----------------------------------------------------------------------

         "प्रिया, तू चोरी केलंस माझं मन, तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन" 
        ---------------------------------------------------------------

प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
माझं मन चोरी केलंस आणि निघूनहि गेलास,
घडू दे तुझं एकवIर, तुझ्या प्रियेला दर्शन

प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
तुझी ही प्रेम-दिवानगी मर्यादा ओलांडू लागलीय,
तिला नाही राहिलीय काही सीमा, नाही राहिलय बंधन 

माझ्या राजा, माझं मन चोरी करून तू असा जाऊ नकोस
माझ्या सर्जा, मला बेताब करून तू दुरून गम्मत पाहू नकोस
ये जवळ लाडक्या, बघ समI सुहाना झालाय, प्रेम बरसवीत आलाय,
तुझं प्रेमजळ पाज मजला, जीव तुझ्याविना कसा प्यासा, तहानलेला राहिलाय

तू माझा राजकुमार, मी तुझी राजकुमारी, तुझ्या मनातली प्रीत-परी
तुझी माझी एकचं प्रेम कहाणी, पुस्तकापुरतीच दिसत नाही बरी
आपली प्रेम गोष्ट प्रत्यक्ष घडतेय, ती आहे खरी, ती उघड नसली जरी,
हा अफसाना पुरे झाला, ये राजा भेट मजला, ही प्रेमाची दूर कर तू दुरी

मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय, मग आपल्यात हे अंतर का ?
तुझंही माझ्यावर निस्सीम प्रेम आहे, मग ही जुदाई का ?
चोरून नेलस माझं मन, आणि आता मला तनहाईत ठेवतोयस,
तुझी आता मला गरज आहे, मग मला आज हा एकांतवास का ?

आता ये, मला तडपवू नकोस, तुझं हे पागलपण मला आवडू लावलंय
आता ये, असा तरसवू नकोस, माझं वेड मन तुला बोलावू लागलंय
माझी मनःस्थिती पहा, मनाची दशा पहा, आणिक दुर्दशा करू नकोस, 
अधिक वाट पाहायला लावू नकोस, बघ माझं प्रेम तुला पुकारू लागलंय

प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
आता आणि नकोस घेऊन प्रेमाची परीक्षा,
केव्हाच सोडवलंय मी प्रेमाचे गणित गहन 

प्रिया, तू चोरी केलंस माझं मन
तुझ्या प्रतीक्षेत झरू लागलेत माझे नयन
आता अजून तुझ्या आठवणीत नको झुरवत ठेवूस,
वाट पाहतंय पहा आपलं भावी जीवन

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2023-रविवार.
=========================================