११-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 11, 2023, 05:21:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११.०९.२०२३-सोमवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "११-सप्टेंबर-दिनविशेष"
                               ---------------------

-: दिनविशेष :-
११ सप्टेंबर
जागतिक प्रथमोपचार दिन
World First Aid Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
वर्ल्ड ट्रेड सेंटर
अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
१९७२
नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित 'तरुण तुर्क, म्हातारे अर्क' या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
१९६५
भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९६१
विश्व प्रकृती निधी
'विश्व प्रकृती निधी' (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.
१९१९
अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१८९३
स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९१७
फर्डिनांड मार्कोस
फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (१९६५ - १९८६)
(मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
१९१५
पुपुल जयकर
पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या अभ्यासक आणि पुरस्कर्त्या, पद्मभूषण (१९६७)
(मृत्यू: २९ मार्च १९९७ - मुंबई)
१९१२
अप्पासाहेब पंत
बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
(मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९२)
१९११
लाला अमरनाथ
नानिक अमरनाथ भारद्वाज तथा लाला अमरनाथ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर
(मृत्यू: ५ ऑगस्ट २००० - नवी दिल्ली)
१९०१
कवी अनिल
आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल' – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, मालवण येथे १९५८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष. 'प्रेम आणि जीवन', 'भग्नमूर्ती', 'चिनी मुलास', 'निर्वासित' ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले आहे.
(मृत्यू: ८ मे १९८२)
१८९५
आचार्य विनोबा भावे
१९८३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
विनायक नरहरी तथा आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, तत्त्वज्ञ, भारतरत्‍न (१९८३, मरणोत्तर), १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. शांतिमय क्रांतीचे कार्य करण्याकरता त्यांनी 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत्'ची घोषणा त्यांनी दिली
(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ - पवनार आश्रम, वर्धा)
१८८५
डी. एच. लॉरेन्स
डेविड हर्बर्ट तथा डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार
(मृत्यू: २ मार्च १९३०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९८
एन. डी. नगरवाला
क्रीडामहर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(जन्म: १० आक्टोबर १९०९ - अहमदनगर, महाराष्ट्र)
१९८७
महादेवी वर्मा
ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना
महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, कादंबरीकार व लघुकथाकार, हिंदी साहित्याच्या छायावादी परंपरेतील चार आधारस्तंभांपैकी एक स्तंभ, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, 'यामा' या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) देण्यात आला.
(जन्म: २६ मार्च १९०७ - फरुखाबाद, उत्तर प्रदेश)
१९७१
निकिता क्रूश्चेव्ह
निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष
(जन्म: १५ एप्रिल १८९४)
१९६४
गजानन माधव मुक्तिबोध
गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक
(जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ - शेओपूर, मध्यप्रदेश)
१९४८
मुहम्मद अली जिना
कैद-ए-आझम बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल
(कैद-ए-आझम = Great Leader)
(जन्म: २५ डिसेंबर १८७६)
१९२१
सुब्रम्हण्यम भारती
सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक
(जन्म: ११ डिसेंबर १८८२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2023-सोमवार.
=========================================