१२-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 12, 2023, 05:11:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.०९.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे"दिनविशेष"

                                  "१२-सप्टेंबर-दिनविशेष"
                                 ---------------------

-: दिनविशेष :-
१२ सप्टेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००५
डिस्‍नेलँड हाँगकाँग
हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
१९९८
डॉ. जयंत नारळीकर यांना 'पुण्यभूषण' पुरस्कार प्रदान
१९८०
तुर्कस्तानमधे लष्करी उठाव
१९३०
विल्फ्रेड र्‍होड्स
विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १,११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१६६६
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४८
मॅक्स वॉकर
मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
(मृत्यू: २८ सप्टेंबर २०१६)
१९१२
फिरोझ गांधी
फिरोझ जहांगीर घंडी तथा फिरोझ गांधी – १९५० ते १९५२ मधील हंगामी संसद सदस्य,पहिल्या (प्रतापगढ, उत्तर प्रदेश) व दुसऱ्या (रायबरेली, उत्तर प्रदेश) लोकसभेतील खासदार, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी, द नॅशनल हेराल्ड आणि द नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
१८९७
आयरिन क्यूरी
आयरिन क्यूरी ज्योलिओट – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३५) फ्रेन्च भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १७ मार्च १९५६)
१८९४
विभूतीभूषण बंदोपाध्याय
विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. 'पथेर पांचाली', 'अपराजित', 'आरण्यक' या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. 'इच्छामती' या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला.
(पथेर पांचाली = Little Song of the Road)
(मृत्यू: १ नोव्हेंबर १९५० - घाटशिला, झारखंड)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९६
पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ 'गंधर्व नाटक मंडळी'मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.
(जन्म: ? ? ????)
१९९६
पद्मा चव्हाण
पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब' असे छापले जात असे. 'महाराष्ट्राची मर्लिन मनरो' व 'सौंदर्याचा अँटम बॉम्ब' हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते.
(जन्म: ७ जुलै १९४८ - कोल्हापूर)
१९९२
पं. मल्लिकार्जुन मन्सूर
पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य). नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
(जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९८०
सतीश दुभाषी
चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर 'मंतरलेली चैत्रवेल' हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.
(जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९८०
शांता जोग
चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर 'मंतरलेली चैत्रवेल' हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.
(जन्म: २ मार्च १९२५)
१९७१
जयकिशन
जयकिशन डाह्याभाई पांचाळ – 'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन यांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन
(जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९५२
सवाई गंधर्व
रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा 'सवाई गंधर्व' – किराणा घराण्याचे हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं. भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू. ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यगीत असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली.
(जन्म: १९ जानेवारी १८८६ - कुंदगोळ, कर्नाटक)
१९२६
विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि 'महाराष्ट्र सारस्वत' या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य 'महाराष्ट्र कवी' नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.१८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे.
(जन्म: ६ नोव्हेंबर १८७१ - पळस्पे, रायगड)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2023-मंगळवार.
=========================================