पिठोरी अमावस्या-माहिती-1

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:04:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "पिठोरी अमावस्या"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

     Pithori Amavasya 2023- पिठोरी अमावस्या हा सण यंदा गुरुवार, दिनांक 14 ऑगस्ट 2023 या दिवशी साजरा केला जाणार आहे.

     अमावस्या तिथी सुरूवात - 14 सप्टेंबर 2023 सकाळी 04.48 वाजता
     अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता

     पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो.

     पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात.

             या प्रकारे करावे पूजन--

     या व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. घरातील मुलांस अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करुन खांद्यावरुन मागे नेत अतीत कोण? असा प्रश्न विचारतात. मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात. अशा रीतीने व्रत पूर्ण केले महणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.

     या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================