पिठोरी अमावस्या-माहिती-3

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:07:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "पिठोरी अमावस्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

=========================================
अनुक्रमणिका--

पिठोरी अमावस्या कधी आहे? When is Pithori Amavasya in Marathi?
पिठोरी अमावस्या  Pithori Amavasya in Marathi
पिठोरी अमावस्या पूजा विधी साहित्य Pithori Amavasya Pooja, Vidhi, Sahitya in Marathi
पूजा साहित्य Things needed in Pooja in Marathi
पूजा कशी करतात? How to perform Pithori Amavasya Pooja in Marathi
पद्धत 1: Method 1
पद्धत 2: Method 2
उत्तर पूजा Uttar Pooja
पिठोरी अमावस्या चे महत्व कथा Pithori Amavasya Importance / Significance & Story in Marathi
मंत्र Mantra
=========================================

     श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या. पिठोरी अमावस्या श्रावणातील अमावस्याच्या दिवशी साजरी केली जाते. सरत्या श्रावणातील शेवटची पूजा म्हणजेच पिठोरी अमावस्या. श्रावण चालू झाला म्हणजे पूजापाठ, व्रतवैकल्य उपवास यांची  रेल चेल चालू होते. अमावस्या झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायांचे आगमन होते.

     काही कारणास्तव जरी पूजा करू शकलो नाही. तर गौरी पूजनाच्या दिवशी सुद्धा करू शकतात.

             पिठोरी अमावस्या कधी आहे? When is Pithori Amavasya?--

     हिंदी पंचांगानुसार प्रत्येक महिना पौर्णिमेपासून बदलतो.राखी पौर्णिमेनंतर भाद्रपद महिना सुरू होतो. म्हणून हिंदी पंचांगानुसार  पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ला येते. म्हणून हिला भाद्रपद अमावस्या असे म्हटले जाते.

     शेतकऱ्यांचा प्रिय बैलपोळा सण देखील याच दिवशी येतो.या दिवशी मातृदिन साजरा केला जाणार आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी दिवस आहे.

     श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. माता दुर्गा  यांची मनोभावे पूजा केली जाते. 64 योगिनी यांचे आव्हान केले जाते. आपल्या मुलांचा आयुष्य मोठा व्हावा अशी प्रार्थना केली जाते. संतती सुख ज्यांना नसते ते देखील ही पूजा करतात. देवीला संतती प्रदान करण्यासाठी प्रार्थना करतात.

       पिठोरी अमावस्या पूजा विधी साहित्य - Pithori Amavasya Pooja, Vidhi, Sahitya--

          पूजा साहित्य Things needed in Pooja--

हळदी, कुंकू, अक्षता
तांदूळ, पीठ
पान, फूल, आघाडा, दुर्वा, हार
वाळू
काकडी
काकडी चे पान किंवा कोणत्याही वेलीचे  पान
तेरड्याची अखंड पानेपुरणपोळीचा स्वयंपाक

--by Divya Devendra
------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भक्तिवेल.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================