पिठोरी अमावस्या-माहिती-4

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:08:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "पिठोरी अमावस्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

                  64 yogini - Pithori Amavasya--

         पूजा कशी करतात? How to perform Pithori Amavasya Pooja--

--पद्धत 1: Method 1--

पूजेची जागा स्वच्छ करून तेथे  पाट ठेवला जातो.

पाटावर तांदुळाने राशी काढली जाते.

त्यावर 64 योगिनी यांना आव्हान देऊन पीठाने मूर्ती तयार केली जाते.

अथवा बाजारातुन चौसष्ट योगिनींच्या फोटो/ पेपर आणला जातो.

हळदी ,कुंकू, अक्षता, हार, फुल, आघाडा, 108 मण्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करतात.

वाळूने आठ छोटे डोंगर बनवतात व त्यांची पूजा केली जाते.

या डोंगरान पुढे काकडी चे पान ठेवतात.

काकडी च्या पानावर काकडीचा काप ठेवतात.

आठ छोट्या पुरणपोळ्या/ स्वयंपाक बनवून त्यादेखील काकडी च्या पानावर ठेवतात.

पिठोरी अमावस्या ची कथा म्हटली व ऐकली जाते.

गणपती देवीची आरती म्हटली जाते.

पिठाने मूर्ती तयार करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे संबोधले जाते.

माठाची भाजी, वालाच बिरड, वडे या पदार्थांचा विशेष करून नैवेद्य दाखवला जातो.

--पद्धत 2: Method 2--

एक खुर्ची घेतात.

खुर्चीला व्यवस्थित साडी घालून घेतात.

घराबाहेर  तेरड्याचे पानांची पूजा केली जाते.

मुख्य दरवाजा ते पूजेचे ठिकाणापर्यंत लक्ष्मीची पावले काढली जातात.

शरीराच्या जागी तेरड्याची अखंड पान ठेवली जातात.

खुर्चीला उत्कृष्टपणे सजविले जाते.

यालाच देवी म्हणून 64 योगिनी असे आव्हान केले जाते.

काकडी, पुरणपोळी असा नैवेद्य दाखवला जातो.

पिठोरी अमावस्या ची कथा ऐकली बोलली जाते.

गणपती व देवीची आरती गायली जाते.

ब्राह्मण भोज, सवाष्ण भोज  होतो.

पूजा झाल्यानंतर आई एका ताटात पुरणपोळी घेऊन बसते. तिच्या मागे तिची मुलं बसतात.

आई प्रश्न विचारते 'अतिथी' कोण?

मुलं आईच्या हातातील पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आपापली नाव सांगतात. असं केल्याने 64 योगिनी मुलांना सुखी व दीर्घायुष्याचे वरदान देतात. अशी मान्यता आहे.

ही पूजा केल्याने पुत्रांना दीर्घायुष्य लागते अशी मान्यता आहे. या दिवशी गंगा स्नान, तीर्थ स्नान व पितृतर्पण  करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे.

             उत्तर पूजा Uttar Pooja--

     त्याच दिवशी संध्याकाळी वाळू, प्रसाद यांना पाण्यात अर्पण करावे. असे केल्याने मुलांना पाण्यापासून भीती राहात नाही अशी मान्यता आहे.

     प्रसाद नैवेद्य अशा वस्तू पाण्यात टाकतो. त्यामुळे जल प्रदूषणाचाप्रश्न उभा राहतो. आपल्याला मला असे वाटते पाण्यात आपण प्रसाद नैवेद्य अर्पण करतो. पूर्वीच्या काळी पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना वेळोवेळी अन्न मिळावे. म्हणून नैवेद्य प्रसाद पाण्यात टाकण्याची पद्धत असावी असे मला वाटते.

--by Divya Devendra
------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भक्तिवेल.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================