पिठोरी अमावस्या-माहिती-6

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:11:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "पिठोरी अमावस्या"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

     Pithori Amavasya-का साजरी केली जाते पिठोरी अमावस्या? प्रत्येक महिलेनं वाचावी ही माहिती-आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा--

     हिंदू पंचांगानुसार गर महिन्यात अमावस्या येते. वर्षातील 12 अमावस्या विविध नावांनी ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे या अमावस्यांचं महत्त्वंही असतं. आज अशीच एक महत्त्वाची अमावस्या आहे, ती म्हणजे पिठोरी.

     आदिशक्ती, दुर्गेची पूजा या दिवशी केली जाते. सुहासिनी महिला या दिवशी पिठाच्या मूर्ती बनवून बाळाचा जन्म आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 

             काय आहे, पिठोरीचं महत्त्वं ?--

     धार्मिक मान्यतांनुसार या व्रताचं महत्त्वं आणि फलदायी य़ोग याविषयीची सर्व माहिती इंद्राच्या पत्नीला देवी पार्वतीनं सांगितली आहे. हा संपूर्ण उपवास आणि व्रत केल्यास निपुत्रीकांना पुत्रयोगाचा आशीर्वाद मिळतो, सहजीवन सुखात व्यतीत होतं.

     असं म्हणतात की, बाळाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला पिठोरी मातेचा उपवास करतात. म्हणूनच श्रावणातील या दर्श अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा मातृदिन म्हणूनही संबोधलं जातं.

     या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत स्नान करणं, गरीबांना अन्न- वस्त्र दान करणं फलदायी ठरतं. असं केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी पितरं प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं.

           पिठापासून साकारण्यात आलेल्या मूर्तींची पूजा--

     सहसा या व्रतामध्ये महिला पिठापासून 64 मूर्ती तयार करतात. या मूर्ती आदिशक्ती दुर्गा आणि अन्य देवी- देवतांना समर्पित असतात. संपूर्ण विधीवत पूजा करत महिला या दिवशी कुटुंब आणि मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. फक्त सुहासिनी महिलाच हे व्रत करु शकतात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-झीन्युझ.इंडिया.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================