पिठोरी अमावस्या-माहिती-7

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:12:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "पिठोरी अमावस्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर महत्त्वाची माहिती.

        आज आहे श्रावणातील पिठोरी अमावस्या, पूजा विधी आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या--

     या अमावास्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.या अमावास्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

     या अमावास्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

     हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येते, जी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. तसेच त्यांना विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावर्षी पिठोरी अमावस्या 14.09.2023-गुरुवार, साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला पितृ तर्पण इत्यादी धार्मिक कार्यात कुशचा वापर केला जातो, म्हणून तिला कुश अमावस्या असेही म्हणतात. या अमावास्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पिठोरी अमावस्या व्रताची पूजा पद्धती आणि महत्त्व जाणून घेऊया.

              पूजा पद्धत--

     पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. पितरांसाठी नैवेद्य आणि दान करावे. भगवान विष्णू आणि महादेवाच्या पूजेसह दानधर्म करा.

             पिठोरी अमावस्येचे महत्व--

     मान्यतेनुसार पिठोरी अमावस्येचे व्रत केल्याने निपुत्रिक लोकांना संततीचे रत्न प्राप्त होते. ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. या दिवशी दुर्गादेवीसह 64 देवींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात. या दिवशी महिला पिठापासून बनवलेल्या देवीची पूजा करतात आणि उपवास करतात.

     पिठोरी अमावस्येला दान, तपस्या आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने पित्तर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. केवळ विवाहित महिलाच पिठोरी अमावस्येचे व्रत आणि पूजा करू शकतात, अशी धार्मिक प्रथा आहे. अविवाहित मुलींनी या दिवशी व्रत करू नये.

--By :News18 Desk
----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकमत.न्युझ १८.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================