पिठोरी अमावस्या-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:19:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "पिठोरी अमावस्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "पिठोरी अमावस्या" आहे. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. (अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता). मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियित्रीना पिठोरी अमावस्येच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सणIवर हार्दिक शुभेच्छा.

     श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी अपत्य नसलेल्या महिला उपवास करतात आणि बाळाच्या जन्मासाठी प्रार्थना करतात. तसेच सर्व मातांना या दिवशी शुभेच्छा दिल्या जातात. भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) च्या दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो.

=========================================
आई म्हणजे, वात्सल्याचा ठेवा

आई म्हणजे, अमृताचा गोडवा

आई म्हणजे, पावसाचा ओलावा

आई म्हणजे, सुखाचा गारवा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



आई नसते केवळ काया

आई असते ओंजळ भर माया

आई असते गगण भरारी

आई असते जसे एक अक्षयगान

आई असते जसे कर्णाचे दान

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू

वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू

अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू

अन् शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला

विसावा तू.....!!

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



हृदयाच्या स्पंदनातील प्रत्येक श्वास म्हणजे आई

अंधारालाही दूर करणारा प्रकाश म्हणजे आई

माझ्या मायेची धरती अन् छायेचं आकाश म्हणजे आई

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



आई या शब्दात दोन अक्षरे आहेत,

पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे,

"आ" म्हणजे आत्मा आणि "ई" म्हणजे ईश्वर

हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी

दोन अक्षरे ती म्हणजे "आई"

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--Bhakti Aghav
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================