बैलपोळा-माहिती-4

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:37:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची माहिती.

            बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती- Bail Pola Information--

       बैल पोळा सण महत्व आणि माहिती, हा सण का, कधी आणि कसा साजरा केला जातो याची माहिती व तारीख, पूजा पद्धत (Bail Pola Festival Kevha aahe, Puja, Celebration, Date).--

     मित्रांनो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलांचे सुद्धा योगदान असते. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा हा सण त्यापैकीच एक आहे, या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात राज्यात साजरा केला जातो.

=========================================
Table of Contents--

बैल पोळा-2023 (Bail Pola Information In Marathi)--

उत्सवाचे नाव-बैल पोळा
इतर नावे-पिठोरी अमावस्या, मोठा पोळा, तान्हा पोळा
सण साजरा करण्याचे ठिकाण-महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
2023 मह्ये केव्हा आहे-14.09.2023-गुरुवार
कुणाची पूजा केली जाते-बैलांची
=========================================

            पोळा सण का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व--

     पोळा हा सण बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण शेतकरी मोट्या उत्साहाने बैलांची पूजा करून साजरा करतो. बैलांना दीवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. Bail Pola या दिवशी बैलांना शेतकरी नदीवर, बोरवेलच्या पाण्यानी किंवा किंवा ओढ्यावर स्वतःच्या हाताने आंघोळ घालीत असतो. त्याच्या शिंगाना रंगीबेरंगी बेगड लावतात, त्याचबरोबर तयांच्या अंगावर ठिपके लावतात, त्यांच्या पाठीवर मस्तपैकी झालर ठेवतात,आणि हो महत्वाचे सांगणे राहिले, बैलाला या दिवशी नावरदेवासारखे डोक्यावर बाशिंग बांधले जाते. म्हणजे या दिवशी बळीराजा आपल्या बैलाला नवरदेव करतो.

     त्याला भाताचे व पुरणपोळीचे नैवैद्य दिले जाते. बैलांना पोळ्याच्या मिरवणुकीत नेण्यात येथे .तिथे सर्वर सुंदर सजवलेल्या बैलाला व त्याच्या मालकास बक्षिसे दिलॆ जाते. त्यानंतर तोरण कापून बैलपोळा फोडला जातो. नंतर शेतकरी त्यांना आमंत्रण देणाऱ्याच्या घरी घेऊन जातो, त्या गॅरी त्याची पूजा केली जाते आणि टोपलीमध्ये जेवण दिले जाते, आणि बैलाच्या मालकास बाजार दिला जातो.

--by Sumedh Harishchandra
--------------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाजत्रा.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================