बैलपोळा-माहिती-5

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:38:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची माहिती.

            2023 मध्ये पोळा सण कधी आहे (Pola Festival Date)--

     पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो, या अमावस्येला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. Bail Pola सण हा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येत असतो. यंदा बैलपोळा 14.09.2023-गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तिथे हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. तिथे बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला तान्हा पोळा म्हणतात.

            बैल पोळा कथा (Bail Pola Story In Marathi)--

     एकदा कैलासमध्ये शिव पार्वती सारीपाटाचा म्हणजेच चौरसाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये मा पार्वती विजयी झाली परंतु शिव मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले. तेव्हा तिथे उपस्थित फक्त नंदी होता.पार्वतीने नंदीला विचारले कि या खेळामध्ये कोण जिंकला. तेव्हा नंदीने शंकराचे नाव घेतले. त्यावर मा पार्वती क्रोधीत झाली आणि नंदीला शाप दिला की, मृत्युलोकीं (पृथ्वीवर) तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील. तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली.

     त्याने मा पार्वतीला क्षमा मागितली. त्यावर गौरीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल. त्या दिवशी तुझ्या मानेवर नांगर राहणार नाही. तेव्हापासून याच कारणात्सव Bail Pola हा सण साजरा करण्याची परंपरा पडली.

            बैल पोळा सणाला पोळा असे नाव का पडले ?--

     जेव्हा भगवान विष्णू कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले, जी आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच त्याचा मामा कंस त्याच्या जीवाचा शत्रू राहिला होता. कान्हा वसुदेव-यशोदासोबत लहानपणी राहत असताना कंसाने अनेक असुरांना त्याला मारण्यासाठी पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला पाठवले होते, ज्याला कृष्णाने आपल्या लीलेने मारले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावास्येचा दिवस होता, या दिवसापासून या दिवसाला पोळा असे नाव पडले. या दिवसाला बालदिन म्हणतात, या दिवशी मुलांवर विशेष प्रेम केले जाते. महाराष्ट्र या दिवसाला तान्हापोळा म्हणतात. या दिवसाला लहान मुलांसाठी पोळ्याचे (Tanha Pola) आयोजन केले जाते.

     तान्हा पोळा हा खासकरून बालगोपालासाठी असतो. या दिवशी लहान मुले आपल्या लाकडी बैलाला सजवत असतात. त्या लाकडी बैलांची धावण्याची शर्यत भरवली जात असते जिंकणाऱ्या तान्ह्या बैलाला पारितोषिक दिले जाते. त्याचबरोबर जो कोणी सर्वात सुंदर आपल्या लाकडी बैलाला सजवितो त्याला सुद्धा बक्षिस दिले जाते. काही ठिकाणी लहान मुले आपल्या लाकडी बैलासोबत फिरत असतात. त्यांना मित्र परिवारातील लोक आपल्या घरी बोलावत आणि त्यानां बोजारा देतात.

             पोळा सण कसा साजरा करायचा--

     पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा (Tanha Pola) अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुले खेळण्यातील बैल घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जाते.

--by Sumedh Harishchandra
--------------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाजत्रा.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================