बैलपोळा-निबंध-1

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:41:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर निबंध.

           बैल पोळा निबंध मराठी | Best Bail Pola Nibandh in Marathi 2023--

     मित्रांनो या लेखाद्वारे आपण Bail Pola Nibandh in Marathi आणि बैलपोळा सणाविषयी माहिती पाहणार आहोत. हा सण साजरा करण्याचे उद्देश देखील बघुयात.

     महाराष्ट्र मध्ये मराठी महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील अमावस्याला बैल पोळा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बैलाची पूजा केली जाते, तर घरातील महिला पुरणपोळीची जेवण बनवून त्या दिवशी बैलाला पुरणपोळीचे जेवण दिले जाते. तसेच बैलांना छान आंघोळ घालून त्यांना धुवून सजवले जाते, व त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. सर्व शेतकरी बांधव मिळून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

     बैलपोळ्याच्या सण शेतीवर आधारित आहे तसेच शहरी भागातही हा सण साजरा केला जातो. पण विशेष आकर्षण हे ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते.

     बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काहीही काम किंवा काही उड वस्तू ओढायला लावत नाहीत, त्या दिवशी त्यांना सकाळी नदीवर अथवा तलाव असल्यास तलावावर नेऊन त्यांना छान आंघोळ घातली जाते नंतर त्यांना डोंगरावर मोकळे चरण्यासाठी घेऊन जातात, व त्यांना पोटभर खाऊ घातले जाते. नंतर त्यांना घरी आणली जाते, त्यांच्या शेंगांना कलर देऊन त्यांची छान सजावट केली जाते. जसे की त्यांच्या अंगावर झोल टाकने, कलर लावणे, त्यांना मोरक्या, गोंडे, तसेच घागरमाळ अशी विविध प्रकारची सजावट करून.

     त्यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, त्याचबरोबर गावातील तरुण वर्ग मिरवणूक समोर नाचत गाजत वाजत पूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्यांना घरी नेऊन त्यांची पूजा केली जाते, व त्यांना गोड गोड जेवण पुरणपोळी हे खाऊ घातले जाते. बैलपोळा बैलाच्या विश्रांतीच्या दिवस असतो.

     पुरातन कथांमध्ये असे म्हटले जाते की एक वेळेस माता पार्वती आणि शिवशंकर हे खेळ खेळत होते, ते खेळ खेळत असताना माता पार्वती तो खेळ जिंकली पण महादेवाला ते मान्य नव्हते. महादेव म्हणत होते की तो खेळ मी जिंकला आहे. त्या खेळाच्या पुरावा म्हणून माता पार्वतीने शिवशंकराचे वाहन नंदी तेथे बसलेला होता, त्यांनी त्या खेळाचा पुरावा म्हणून नंदीला विचारले की कोण जिंकले तर त्याने शिवशंकराची बाजू घेत शिव शंकर जिंकले असे म्हटले.

     तर त्यावेळेस माता पार्वतीने रागात येऊन नंदीला शाप दिला की तुला पृथ्वी तालावर जाऊन तुला राब राब कष्ट करावे लागतील, तेव्हा नंदिनी क्षमा मागत, आपली चूक मान्य करत अशी विनंती केली मला क्षमा करा तेव्हा माता-पार्वतीने क्षमा करत सांगितले की, वर्षांतील एक दिवस तुला पृथ्वीतलावर देवासारखे पुजले जाईल. त्यामुळे बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

--Author :- Mr. Shankar Kashte
-----------------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीटाईम.इन)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================