बैलपोळा-निबंध-5

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:45:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर निबंध.

            बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi--

     ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे 'पोळा' हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीचा व्यवसाय बैलांच्या जिवावरच करता येतो. भारतीय संस्कृतीत गाई बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते.

     'पोळा' हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी पहाटेच शेतकरी बैलाला आंघोळ घालतात. मग बैलाला सजविण्याचे काम सुरू होते. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे छापे मारतात. शिंगांना रंग देतात. बैलांच्या गळ्यात घुगूरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात. बैलं सजले की गावातील सगळ्या बैलांची मिरवणूक काढतात. त्यावेळी तरुण मुले मिरवणुकीपुढे बेभान होऊन नाचतात. त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले बैल घरी नेतो. तिथे त्याची पत्नी बैलाची मनोभावे पूजा करते. त्याला पोटभर पुरण पोळी खाऊ घालते. घरातील लहान थोर बैलांच्या पाया पडतात.

     बैलांची मिरवणूक ज्यांच्या दारावरून जाते ते लोक बैलांची पूजा करतात. स्वत:च्या मालकीचे बैलं नसले तरी कोणत्याही बैलाची पूजा केल्यास चालते. शहरात बैलं नसतात म्हणून लोक कुंभाराकडून मातीचे बैलं आणून त्यांची पूजा करतात.

     पोळ्याच्या दिवशी बैलाला कोणत्याही कामाला लावण्यात येत नाही. त्याला मारत नाहीत. माणसाबद्दलची कृतज्ञता तर कुणीही व्यक्त करतो, पण प्राण्याबहलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य जगात फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमे.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================