बैलपोळा-निबंध-9

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:52:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "बैलपोळा"
                                        -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची निबंध.

            बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh in Marathi--

     मित्रांनो आज "बैल पोळा निबंध मराठी" या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

     सर्व प्रथम बैलपोळा या सणानिमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!!! कष्टा शिवाय मातीला आणि, बैला शिवाय शेतीला पर्याय नाही!

     हजारो वर्षांपासून आपल्यासाठी, राबणाऱ्या बैलांचा हा सण पोळा..!! श्रावण काढगाची सुरुवातच सणांची करणारा असत. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते.

     या सणांबरोबरच सरत्या श्रावणात अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो.

     मारण्याची तुतारी /आसूड वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्याच थी बैलांना आमंत्रण. देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी त्यांना तलाव, नदी, ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते.

     या दिवशी बैलाच्या मानेला हळद व तुपाने यकले जाते पीठावर सुरेख सुरेख नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेहरू चे टिपके शिंगाना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पाण्यात चांदीचे वा करदोड्याचे तोडे , खायला गोड पुरणपोळी अन्नाचा नैवेद्य असते.

     पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा मित्र, सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो.

--by Nibandh Marathi
------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-निबंधमराठी.इन)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================