बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:17:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

       [2023] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश--

=========================================
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं...,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸

तू रे वाहान शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.
🌸🌸🌸🌸

आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी...
तिला स्वतःच्या हाताने चिखलाची
(काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा
सरंजाम करून खेळ मांडला जायचा...
सोबत गोड चकली असायचीच..
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
=========================================

--by Shabdakshar
---------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शब्दIक्षर.इन)
                       --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================