बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:20:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

           बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊ द्या रे पोटभरी
होऊ द्या रे मगदूल
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!

शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीमराठीsms.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================