१५-सप्टेंबर-दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, September 15, 2023, 10:23:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०९.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "१५-सप्टेंबर-दिनविशेष"
                                ---------------------

-: दिनविशेष :-
१५ सप्टेंबर
जागतिक लोकशाही दिन
International Day of Democracy
विश्वकर्मा दिवस
भारतीय अभियंता दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००८
लेहमन ब्रदर्स
लेहमन ब्रदर्सचे न्यूयॉर्कमधील कार्यालय
लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळे काढले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दिवाळखोरी आहे.
२०००
सिडनी ऑलीम्पिक्सचे शुभंकर
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९५९
प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.
१९५९
निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.
१९५३
श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड
१९४८
भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत
१९३५
जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
१९३५
द डून स्कूल
भारताचे पहिले पब्लिक स्कूल 'द डून स्कूल' (The Doon School) सुरू झाले. राजीव गांधी, संजय गांधी, राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, जितीन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे, करण सिंग, नवीन पटनायक, अमरिंदर सिंग, कमल नाथ, पिलू मोदी, एल. एम. थापर, अरुण पुरी, विक्रम चंद्र, करण थापर, प्रणॉय रॉय, अभिनंदन सेखरी, रामचंद्र गुहा, अमिताव घोष, अभिनव बिंद्रा हे या शाळेचे काही नामवंत माजी विद्यार्थी आहेत.
१९१६
पहिले महायुद्ध – लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर सॉमच्या युद्धात केला गेला
१८२१
कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडूरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन
१८१२
नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक
(जन्म: १८ जून १९३१)
२००८
गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(जन्म: २५ ऑगस्ट १९२३)
१९९८
गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ लवंदे यांचे मलेरियाच्या आजाराने निधन झाले.
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================