१५-सप्टेंबर-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, September 15, 2023, 10:25:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०९.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "१५-सप्टेंबर-दिनविशेष"
                               ----------------------

=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४६
माईक प्रॉक्टर
माईक प्रॉक्टर – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच
१९३९
सुब्रम्हण्यन
सुब्रम्हण्यन स्वामी – जनता पक्षाचे अध्यक्ष, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, योजना आयोगाचे सदस्य, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार
१९३५
दया पवार
दगडू मारुती तथा 'दया' पवार – 'बलुतं'कार दलित लेखक
(मृत्यू: २० डिसेंबर १९९६)
१९२१
कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
(मृत्यू: २६ डिसेंबर २००६)
१९०९
रत्‍नाप्पा कुंभार
रत्‍नाप्पा भरमाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
(मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)
१९०९
सी. एन. अण्णादुराई
कांजीवरम नटराजन तथा सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री
(कार्यकाल: १४ जानेवारी १९६९ ते ३ फेब्रुवारी १९६९)
(मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)
१९०५
रामकुमार वर्मा
रामकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे 'वीर हमीद', 'निशीथ', 'चितोड की चिता' इ. काव्यसंग्रह, 'एकलव्य' हे खंडकाव्य, 'पृथ्वीराज की आँखे', 'रेशमी टाई', 'सप्तकिरण', 'शिवाजी' इ. एकांकिका संग्रह व अनेक नाटके प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: ५ आक्टोबर १९९०)
१८९०
अ‍ॅगाथा ख्रिस्ती
अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथा लेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी 'मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स' ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे.
(मृत्यू: १२ जानेवारी १९७६)
१८७६
शरदचंद्र चट्टोपाध्याय
शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक. त्यांच्या 'देवदास' या कादंबरीवर (विविध भाषांत) १६ चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या 'पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु. बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे 'भारती' या नावाने मराठीत भाषांतर केले आहे.
(मृत्यू: १६ जानेवारी १९३८)
१८६०
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय अभियंता दिन म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतरत्‍न (१९५५)
(मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
१२५४
मार्को पोलो – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी
(मृत्यू: ८ जानेवारी १३२४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================