दिन-विशेष-लेख-जागतिक लोकशाही दिन

Started by Atul Kaviraje, September 15, 2023, 10:27:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                                 "जागतिक लोकशाही दिन"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-15.09.2023-शुक्रवार आहे.  १५ सप्टेंबर-हा दिवस "जागतिक लोकशाही दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन ( International Democracy Day 2022 ) दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. यादिवसी जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेतला जातो. 2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन आणि एकत्रिकरणा संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर केला.

     २००७ सालच्या राष्ट्रकूलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली होती. त्यामागे, एक पार्श्वभूमी होती.

     जोसेफ तुस्कानो २००७ सालच्या राष्ट्रकूलच्या सर्वसाधारण सभेत या जागतिक लोकशाही दिनाची घोषणा झाली होती. त्यामागे, एक पार्श्वभूमी होती. फनिर्नंड माकोर्स या फिलीपिनमधल्या हुकूमशहाची २० वर्षांची सत्ता तिथल्या जनशक्ती क्रांतीदलाने उलथवून लावली, तेव्हा तिथल्या नव्या राष्टाध्यक्ष कोसाझोन अक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली १९८८ साली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. अस्तित्वात असलेल्या व नव्याने उदयास आलेल्या प्रजासत्ताक राज्याच्या तत्त्वपूर्ण नियमावलीची प्रतिष्ठना करणे हा या परिषदेचा हेतू होता. या परिषदेच्या कतार, दोहा येथे भरलेल्या सभेत लोकशाहीच्या हितार्थ राष्ट्रकुलाने पुढाकार घ्यावा याचा पुनरुच्चार झाला. पुढे १९९७ च्या सप्टेंबरमध्ये आंतर-लोकसभा संघटनेने लोकशाही मूल्याचा उद्घोष केला नि राष्ट्रकूलाला जागतिक लोकशाही दिन जाहीर करावा लागला.लोकशाही हे एक सार्वत्रिक मूल्य आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होते व तो सार्वजनिक बंधने पाळीत मुक्तपणे आपले जीवन जगू शकतो. आपल्या हक्काची मागणी करीत असताना, नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले तर लोकशाही अखिल मानवतेला हितकारक ठरते.लोकसत्ताक राज्याला इंग्रजीत 'डेमोक्रसी' हा प्रतिशब्द आहे व तो ग्रीक शब्द 'डेमोज' म्हणजे लोकं आणि 'क्रेटीन' म्हणजे राज्य करणे, यावरून अप्रभ्रंशित झाला आहे. लोकांनीच राज्य करण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीकांनी सुरू केली होती. समानता आणि स्वातंत्र्याद्वारे सार्वजनिक जीवनात शांती पसरावी हा लोकशाहीचा हेतू असतो. त्यामुळे, सार्वजनिक कामकाजात नागरिकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार लाभलेला असतो. मानवी हक्क अबाधित राखून, त्याचे संवर्धन करणे हे लोकशाहीचा तो मुख्य हेतू असतो. त्यासाठी लोकांना नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते. लिंग, जात, धर्म या सर्वापेक्षाही मानवता महान हेच लोकशाहीचे सूत्र असते. महिलांच्या सहभागाने तर लोकशाहीची शान वाढते. परंतु, लोकसंख्येत अर्धा वाटा असूनही जगातल्या लोकसभांत त्यांचा सहभाग अल्पसा आहे. तो वाढावा म्हणून देखील आजच्या दिवसाची जागृती आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे हा आजच्या दिवसाचा हेतू साध्य झाला तरच, अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे 'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, हे खरे ठरेल...

     इंटरनॅशनल इंजिनियर डे आपल्या देशात डॉ. एम. विश्वेश्वरय्या नावाचे एक महान इंजिनियर होऊन गेले. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स' ही भारतातील इंजिनियर्सची संघटना. त्याचा १५ सप्टेंबर हा वाढदिवस 'इंटरनॅशनल इंजिनियर्स डे' म्हणून साजरा करते. यावषीर् त्याची १५० वी जयंती साजरी होत आहे. १९५५ साली सर विश्वेश्वरय्यांना 'भारतरत्न' या सवोर्च्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. यावरून त्यांच्या हयातीतील प्रचंड कार्याची कल्पना येते.भदावती स्टील कारखान्याची निमिर्ती, म्हैसूर युनिव्हसिर्टीची स्थापना, कृष्णराजसागर धरणाची बांधणी, म्हैसूर बँक या अशा संस्था नि वास्तूचे ते शिल्पकार होते. आपल्या देशाला त्या काळात प्रगतीपथावर ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. इंग्रजांची सत्ता असताना म्हैसूर राज्यातच नव्हे तर त्यानंतर केंदीय सरकारातदेखील मोठमोठी जबाबदारीची नि महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. वयोवृद्ध होईपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले. वयाच्या ९२ व्या वषीर् पाटण्याला जाऊन गंगेवर पूल बांधण्याच्या कामाची त्यांनी आखणी केली होती. कुठल्याही प्रकारचा थाटमाट न करता, ते साधेपणाने जगले. गोरगरीबांच्या हितासाठी, त्यांनी कितीतरी प्रकल्पांत स्वत:ला झोकून दिले होते. १५ सप्टेंबर १८६० साली जन्मलेल्या या बुद्धिमान तंत्रशोधकाचे १४ एप्रिल १९६२ रोजी महानिर्वाण झाले. एका भारतीय इंजिनियरच्या गौरवार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो, ही किती गौरवाची बाब आहे.

--महाराष्ट्र टाइम्स.कॉम
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्रटाईम्स.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================