दिन-विशेष-लेख-विश्वकर्मा दिवस

Started by Atul Kaviraje, September 15, 2023, 10:29:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                     "विश्वकर्मा दिवस"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-15.09.2023-शुक्रवार आहे.  १५ सप्टेंबर-हा दिवस "विश्वकर्मा दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     लोकांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टींचा निर्माता आणि घरे, मंदिरे आणि इमारती, मूर्ती इत्यादी बांधणारा आणि अलंकार निर्माण करणारा तो आहे. आजही सोनार, लोहार,सुतार, कुंभार, कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात. भारतात दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा दिन आणि त्यांची जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो.

              विश्वकर्मा जयंतीः जन्मकथा, कार्य आणि पूजाविधी--

     माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. जाणून घेऊया विश्वकर्मा यांची जन्मकथा, त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंविषयी आणि विश्वकर्मा पूजेच्या विधीविषयी...

     माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. या दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. निर्मिती, बांधकाम, शिल्पकला, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विश्वकर्मांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

              विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा--

     विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार, ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली.

             विश्वकर्मा यांची आश्चर्यकारक निर्मिती--

     विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले, अशी मान्यता आहे. या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे.

             विश्वकर्मा यांची पूजा--

     कारागीर आपली अवजारे, यंत्रे, कलाकुसरीचे साहित्य यांची पूजा करतात. कारागिरांना कामकाजात उपयोगी येणारी यंत्रे, अवजारे स्वच्छ करून घ्यावीत. विष्णू देवांसह विश्वकर्मा यांची प्रतिमा स्थापन करावी. दोन्ही देवतांना हळद-कुंकू, अक्षता, गुलाल, वस्त्र, फूले अर्पण करावीत. पीठाची रांगोळी काढून त्यात सात प्रकारची धान्ये ठेवावीत. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. विष्णू देव आणि विश्वकर्मा यांची प्रार्थना करावी. धूप-दिप अर्पण केल्यानंतर ऋतूकालोद्भव फळे, मिष्ठान्न, पंचमेवा, पंचामृत यांचा नेवैद्य दाखवावा आणि आरती करावी.

--Devesh Phadke
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्रटाईम्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================