आई ..........

Started by JEETU_MUMBAI, November 02, 2010, 03:08:20 PM

Previous topic - Next topic

JEETU_MUMBAI

आई तुझ्या अपरंपार कष्टाच
आज बीज होऊ दे

डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे
आज चीज होऊ दे

तु पार केलेस डोंगर दुःखाचे
पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे

किती सहन केलस आयुष्य यातनांच
आज मला तुझे आभाळ होऊ दे

सांधत राहिलीस फाटका संसार
तुझ्या सहिष्णुतेचे बळ होऊ दे

तुझ्या दुभंगलेल्या स्वप्नांना सांधणार
आज मला ठिगळ होऊ दे

भरवलेस घास उपाशीपोटी
तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे

आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी
आज मला ती भाकर होऊ दे

तुझ्या अथांग मायेची ऊब
माझ्या जगण्याच सार होऊ दे

कळले नाही देवपण तुझे
मला तुझ्या मंदिराचे द्वार होऊ दे

ऊन वादळात जपलस घरट्याला
झाडाला सावरणार मूळ होऊ दे

कळली नाही पतझड तुझी
मला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे

ओंजळीत जपलस आयुष्य माझे
तुझ्या चरणावर वाहिलेल फुल होऊ दे

मागून मागून काय मागू
पुन्हा मला तुझ्या कडेवरच मूल होऊ दे

दिगंबर कोटकर

काय छान कविता आहे     

martin22

फार छान, सुन्दर काव्य.

amoul

खूप खूप छान ओळी आहेत मित्रा  खूपच छान !!
सगळ्याच ओळीत मर्म आहे . मला फार फार आवडली.

NilamT


vandana kanade

ओंजळीत जपलस आयुष्य माझे
तुझ्या चरणावर वाहिलेल फुल होऊ दे

JEETU_MUMBAI

धन्यवाद सर्वांचे