हरितालिका-माहिती-1

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:01:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

        Hartalika Tritiya 2023 : यंदा हरतालिका कधी आहे? जाणून घ्या व्रताचे मुहूर्त आणि महत्व--

     भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून, शिवा भूत्वा शिवां यजेत् या भावनेने हरितालिकेची पूजा करावी, असे सांगितले जाते. अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते. 'हर' हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. 'हरी' हे भगवान विष्णूचे नाव आहे.

     हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्येही दोन्ही शब्द आढळतात. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे.

     सुरूवातीला बघुया हरतालिका व्रताचे महत्व..भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळविण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात.

     हरतालिका व्रताचे पूजन कसे करतात?हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. देशातील अनेक भागांत सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. सकाळी नित्योपचार उरकल्यांतर हरितालिका व्रतपूजनाचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर स्थापना कराव्यात. महाराष्ट्र या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो.

--By-सकाळ डिजिटल टीम
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ई सकाळ.कॉम)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================