हरितालिका-माहिती-5

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:07:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

     कडक उपवास , तपश्चर्या करू लागली असे करता करता पार्वतीने पूर्ण १२ वर्ष महादेवाची तपश्चर्या केली व्रत केले . हे व्रत करत असतांना पार्वती जंगलातील पाने खात असे.

     त्या नंतर तिने नदीमध्ये असलेल्या वाळू पासून बनवलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली . व त्या दिवशी संपूर्ण दिवस कडक निर्जला उपवास केला. तो दिवस भाद्रपत शुक्ल पक्ष तृतीयाचा तो दिवस होता .

     पार्वतीची अशी भक्ती बघून शिव -शंकर तिच्याजवळ ब्राम्हण (भट ) बनून गेले. आणि पार्वतीला म्हणाले. हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस , त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ , शिवशंकर , सृष्टी निर्माता माझे पती व्हावे म्हणून मी हे उपवास आणि व्रत केले आहे .

     पार्वतीचे सर्व म्हणणे ऐकून भट म्हणाले हे सुंदरी तू तर हिमालयाची कन्या आहेस आणि तुझ्यासाठी विष्णू हेच योग्य वर आहेत . श्री विष्णू सर्वगुण संपन्न आहेत त्यालाच तू वर कर .

     शंकराचा नाद तू सोडून दे कारण शंकर खूप क्रोधीत आहे व तो वाघाची कातडी परिधान करतो सर्पाला गळ्याभोवती ठेवतो आणि स्मशानात राहतो त्याचा बरोबर त्याच्या सोबत भूतगन राहतात .

     त्या ब्राम्हणाचे ( भटांचे ) बोलणे ऐकून पार्वती क्रोधीत होऊन त्याला म्हणते हे शिवनिंदका तू इथून चालत हो , तू शंकराची निंदा करतोस मला तुझे तोंड सुद्धा बघायचे नाहीये .

     तू भट आहेस म्हणून मी तुझे बोलणे ऐकून घेतले नाहीतर मी तुला शिक्षा (शाप ) दिली असती. असे पार्वतीचे उद्गार ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले.

     शिवशंकर हे खऱ्या रूपात पार्वती समोर आले .व त्यांना बघताच पार्वतीने त्यांचा जयजयकार हे शिव चंद्र मोहिनी असा उद्गार करून त्यांचे चरण धरले . व शंकर प्रसन्न होऊन म्हणले हे पार्वती तुला काय हवे आहे . ते वर माग मी ते देईल .

     हे ऐकून पार्वतीने शंकराला म्हणाली हे जगदेश्वरा तुझ्या अर्धन्गिनी मला ठाव दे ,मला तुमची अर्धांगिनी बनवा असे वर पार्वतीने शंकरास मागितले असता शंकरानी तथास्तु असे म्हणून पार्वतीस मागितलेले वर दिले .

     त्या नंतर पार्वती आपल्या पित्याच्या सदनात गेली . त्यानंतर सप्त ऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठवले . व हिमालयाने शंकराचे आदराने पूजन केले . आणि खरोखर शिव व भवानी (पार्वती ) यांचा जोडा शोभणारा व अनुरूप आहे . असे ब्रम्ह देवांनी हिमालयाला सांगितले व ते त्याला पटले .

     शिव-पार्वतीचे त्याने लग्न लावून दिले अशी हि पुरातन हरतालिका कथा आहे . एकदा शिव आणि पार्वती हिमालयावर बसले होते. तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले हे प्रभू ,नाथ सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणते आहे .

     त्यावर शिव म्हणले हे पार्वती सवार्त र्श्रेष्ठ हरतालिका हे व्रत आहे . याच व्रतामुळे तूझे मनोरथ, इच्छा पूर्ण झाली व तू माझी अर्धांगिनी , स्वामींनी झालीस.

     तुझ्या प्रमाणे जे कुणी हे व्रत करेल . ह्या व्रताची मनोभावे आराधना करेल त्यांचे हि मनोरथ पूर्ण होईल . ज्या सुवासिनी हे व्रत पूर्ण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. त्यांना संपत्ती , संतती प्राप्त होईल .जीवन सुखी आणि आनंदी होईल असे महादेव पार्वतीस म्हणाले .अशी हि हरतालिकेची कथा , कहाणी ( Hartalika Vrat Katha ) इथेच संपूर्ण होते .

          How to do Hartalika Puja at home in marathi | हरतालिका पूजा घरी कशी करावी ?--

     खरं तर हरतालिकेची पूजा हि सर्व बायका किंवा सखी ,मैत्रिणी मिळून केली जाते . सगळ्या जणी एका ठिकाणी जमतात व एका मोकळ्या हॉल किंवा खोली मध्ये हि पूजा करतात .परंतु जर कुणाला शक्य नसेल बाहेर जाऊन पूजा करणे तेव्हा मात्र तुम्ही Hartalika Puja at home म्हणेज घरच्या घरी देखील हि पूजा करू शकता . चला तर मग बघूया hartalika puja marathi मध्ये. आणि पूजे साठी लागणारे साहित्य आणि घरच्या घरी हि पूजा कशी करायची याची रीतसर विधी .

        हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य आणि सामान यादी | Hartalika Puja sahitya--

१ तांब्या ,फुले, पळी , व ताट , नैवेद्याची वाटी ,समई ,दिवा, तेलातील व तुपातील वाती ,हळद कुंकू , अक्षदा , २ नारळ, ५ फळे ( आंबा ,पेरू ,सफरचंद , डाळिंब, केळी ) हि फळे किंवा दुसरी कोणतीही फळे चालतील . विड्याची २ पाने , ५ सुपाऱ्या ,५ पूजेचे बदाम, ५ खारका , ५ हाडकुण्ड , कापसाची वस्रे , गुळखोबरे, धोत्र्याची फळे , आंब्याची पाने , जास्वंदाची पाने , केळीचे ४ खांब , चौरंग , आघाळयाची पाने , बकुळीची पाने, चाफ्याची पाने. रांगोळी आणि पंचामृत (दही, दूध ,तूप ,साखर ,मध १ तुळशीचे पान ) हे ५ साहित्य एकत्रित करून पंचामृत बनवावे . महादेवाची पिंड बनवण्यासाठी नदीतील वाळू आणावी आणि ती पाण्याने स्वच्छ धावून घ्यावी. एवढे साहित्य घ्यावीत. त्याच बरोबर पार्वती साठी सौभाग्य अलंकार पुढील प्रमाणे घ्यावे .

--By-poonam m.
-------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================