हरितालिका-माहिती-6

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:08:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

           सौभाग्य अलंकार |Saubhagya Alankar--

बांगळ्या , गळसरी , आरसा , टिकली , फुले, हळद कुंकू , काजल ,खण , फणी ,कंगवा , नारळ ,तांदूळ, सुपारी ,अत्तर , १ रुपयाचे नाणे . इत्यादी सर्व साहित्य आणावे किंवा दुकानात हे सर्व पूजेच्या एका पाकिटात हल्ली मिळतात.

          हरतालिका पूजा विधी | Hartalika teej Puja vidhi | hartalika puja in marathi

            गणेश पूजन | Ganesh Pujan--

     डाव्या हातात पळी घ्यावी आणि पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे आणि ते पाणी प्यावे असे ३ वेळा करावे . आणि केशवाय नमः माधवाय नमः असे म्हणावे आणि पुन्हा हातात पाणी घेऊन ते ताटात सोडावे .

     हीच क्रिया पुन्हा ३ वेळा करावी आणि नंतर हात जोडावे . वामनाचे नमः ,हृषीकेशाय नमः ,शंकर्शणाय नमः ,जनार्दनाचये नमः श्री कृष्णाये नमः असे म्हणावे , त्यानंतर हातात अक्षदा घेऊन पुन्हा हात जोडावे आणि आपल्या कुलस्वामिनी ,कुलदेवता , गणपती देवता ,शंकर पार्वती यांचे स्मरण करायचे आणि नमस्कार करावा .

     त्या नंतर लक्ष्मी नारायण अभ्यंनमः ,मातापितृ अभ्यंनमः, कुलदेवता इष्टदेवता अभ्यंनमः अभिग्या नमस्तु , शालिवाहन शके ,आता या शुभ दिवसाचा तिथी वार ,योग, यांचा उल्लेख करावा .

     हातातल्या ज्या अक्षदा आहेत त्या उजव्या हातात घेऊन त्यावर थोडे पाणी घ्यावे , आणि पुढील संकल्प म्हणावा मम ,आत्मनः ,सखळश्रस्त्रा ,पुराणयुक्त ,फल प्राप्त्यर्थं , श्री परमेश्वरम ,मम समस्त पापक्षया , अखंडित सौभाग्य ,पुत्रपौत्र ,धनधान्य ,सखल ऐश्वर्य ,उमा महेश्वर देवता प्रीत्यर्थम , प्रतिवार्षिक विहितम ,हरतालिका प्रातांग्यांतवे नमः ,उमामहेष पूजनमः कारिक्षे असे म्हणून हातातील अक्षदा आणि पाणी ताटात सोडावे .

     त्या नंतर पुन्हा हातावरून २ वेळा पाणी सोडावे गणेषपूजा ,दीपपूजा करिषेय. असे म्हणून इथे संकल्प पूर्ण करावा. सर्व प्रथम गणपती पूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी चौरंग मांडावा त्यावर ४ केळीचे खांब बांधावे. त्यानंतर तांदुळाची रस करून त्यावर सुपारी ठेवावी . आणि त्या सुपारीला गणपती म्हणून पूजा करावी .

     त्यानंतर हातात पुन्हा अक्षदा घ्याव्या आणि गणपतीचे ध्यान करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ , निर्विघ्नम कुरुमेदेव सर्वकार्ये सु सर्वदा । असे म्हणून हातातील अक्षदा गणपतीला म्हणजेच सुपारीला वाहाव्या . आसनस्थाने समर्पयामि महागणपतेय नमः म्हणावे नंतर फुलाने किंवा दुर्वेने पाणी घेऊन ते गणपतीवर शिंपडावे .

     पुन्हा पळीत पाणी घेऊन त्यात गंध ,अक्षदा टाकाव्यात आणि हे पाणी पुन्हा गणपतीवर फुलाने शिंपडावे . अर्घ्यम समर्पयामि असे म्हणावे . पुन्हा शुद्ध पाणी घेऊन २ वेळा गणपतीवर शिंपडावे . त्या नंतर कापसाची वस्रे (कपडे ) गणपतीला वाहावीत . करंगळी जवळचे बोट आणि अंगठा यामध्ये प्रथम हळद आणि नंतर कुंकू वाहावे .

     गणपतीला लाल सुवासिक फुल्ल किव्वा कोणतेही सुवासिक फुल वाहावे . पुष्पम समर्पयामि ,त्यानंतर बेलाचे पान वाहावे . त्यानंतर अगरबत्ती ओवाळावी आणि निरंजन ओवाळावे .

     धुपम्म दीपम्म समर्पयामि म्हणावे आणि डाव्या हाताने घंटा वाजवावी . त्या नंतर गणपती समोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर खोबऱ्याच्या वाटीत गुळ एकत्र करून हा नैवद्य वाटीत ठेऊन गणपतीला दाखवावे . आणि त्या भोवती २ वेळा पाणी फिरवावे . गुळखाद्य नैवेद्यं समर्पयामि असे म्हणावे .

     गणपतीजवळ एक विडा ( विड्याची पाने ) ठेवावा आणि त्यावर एक फळ ठेऊन पाणी सोडावे . गणपतीला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी . याठिकाणी गणपतीचे पूजन पूर्ण झाले .

             मूर्तीची प्राणप्रतिष्ठा | गौरी पूजन | हरतालिका मूर्ती पूजा--

     आता पाणीच्या कलशाची , घंटेची , दिव्याची पूजा करावी . गंध ,अक्षदा, फुल वाहून नमस्कार करावा . त्यानंतर पळीत पाणी घेऊन सर्व पूजेच्या साहित्यावर शिंपडावे .

     त्या नंतर गौरीच्या मुर्त्या चौरंगावर ठेवाव्यात आणि हातात दुर्वा घेऊन त्या मूर्तीच्या हृदयाशी लावाव्यात त्या नंतर त्या मूर्तीच्या पायाशी ठेवाव्यात .आणि हात जोडून नमस्कार करावा .

--By-poonam m.
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================