हरितालिका-माहिती-8

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:15:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

            हरतालिका तीज २०२३ :--

=========================================
Table of Contents--

हरतालिका तीज २०२३ प्रस्तावना –
इतिहास (Hartalika Katha Marathi History)-
हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी 2023 (Hartalika Teej Puja Vrat Katha Marathi)
२०२३ मध्ये हरतालिका पूजा मुहूर्त कधी आहे?
हरतालिका अर्थ (Hartalika Meaning) –
हरतालिका भारतात कुठे कुठे साजरी केली जाते ?
हरतालिका महत्व –
हरतालिका व्रताचे वैशिष्ट्य(Hartalika Teej 2023 Marathi) –
हरतालिका का साजरी करतात? –
हरतालिका पूजा मराठी व्हिडिओ –
हरतालिकेच्या दिवशी दान करावयाच्या वस्तू –
हरतालिका व्रताच्या दिवशी काय करावे?
हरतालिका व्रताच्या दिवशी काय करू नये?
हरतालिका कधी आहे? शुभ मुहूर्त –
हरतालिका पूजा माहिती –
हरतालिका पूजा साहित्य मराठी –
हरतालिका तीज व्रत कथा पूजाविधी मराठी-
पूजेची सांगता –
हरतालिका पूजेचे नियम –
हरतालिका आरती (Hartalika Aarti) –
हरतालिका तीज व्रत कथा मराठी (Hartalika Puja Vrat Katha Marathi) –
हरतालिका मंत्र –
FAQ –
हरितालिका कधी आहे?
हरितालिका म्हणजे काय?
हरितालिकेचे व्रत का करतात?
हरितालिकेचा उपवास कसा करावा?
हरितालिकेचे व्रत कोणी करावे?
निष्कर्ष : Conclusion –
=========================================

              हरतालिका तीज २०२३ प्रस्तावना –

     आपल्या भारत देशाला धार्मिक परंपरा आहे प्रत्येक सण आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा असाच एक सण म्हणजे हरितालिका व्रत. हे व्रत कसे करावे, याबाबतची कथा, या सणाचे महत्त्व काय आहे, याची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया हरितालिका व्रत.

            इतिहास (Hartalika Katha Marathi History)--

     एका पौराणिक कथेनुसार, देवी सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शंकरांनी संन्यास घेतला आणि अध्यात्मात पडले. सतीने माता-पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या राजाची कन्या म्हणून जन्म घेतला. कालांतराने जेव्हा ती विवाहयोग्य झाली, तेव्हा नारद यांच्या सांगण्यावरून, हिमालय राजांनी पार्वतीचा विवाह भगवान विष्णू यांच्याबरोबर करण्याचा निर्णय घेतला. परंतु पार्वतीचे भगवान शंकर यांच्यावर प्रेम होते. तिला पती म्हणून भगवान शंकर हवे होते. मग तिच्या सखीनी तिला पळवून नेले आणि हिमालयात लपवले. भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने शांतता सोडून, गृहस्थाच्या जीवनात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, आणि माता-पार्वतीला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. हा शुभ योगायोग भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील तृतीयेला घडला, म्हणून या तिथीला हरितालिका साजरी केली जाते.

=========================================
सणाचे नाव –हरतालिका
समर्पित –भगवान शंकर
दुसरे नाव –हरितालिका व्रत
धर्म –हिंदू
कधी असते –गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी
मराठी महिना –भाद्रपद
इंग्रजी महिना –ऑगस्ट/सप्टेंबर
२०२३ मध्ये हरतालिका पूजा मुहूर्त कधी आहे?
हरतालिका यावर्षी १८ सप्टेंबर २०२३ ला सोमवार या दिवशी आहे.
शुभ मुहूर्त – सकाळी ०६.०७ मिनिटे ते ०८.३४ मिनिटांपर्यंत
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================