हरितालिका-माहिती-9

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:16:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

             हरतालिका अर्थ (Hartalika Meaning) –

     हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिच्या सखी तपश्चर्येला घेऊन गेल्या, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. आणि पार्वतीने केलेल्या या तपश्चर्येला हरितालिका व्रत असे म्हणतात.

            हरतालिका भारतात कुठे कुठे साजरी केली जाते ?--

     हे व्रत संपूर्ण भारतभर साजरे केले जाते. पार्वतीप्रमाणेच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा, म्हणून भारतातील कुमारिका हे व्रत करतात. तसेच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी सुवासिनी स्त्रिया हरितालिकेचे व्रत मोठ्या भक्ती भावाने करतात.

भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतामध्ये ही हे व्रत केले जाते.

तामिळनाडूमध्ये भाद्रपद शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात.

महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातही हे व्रत केले जाते.

               हरतालिका महत्व –

     पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच त्याच्याप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी, तसेच कुमारीका आपल्याला इच्छित पती मिळावा यासाठी या हरतालिका व्रताचे पालन केरतात. हे व्रत करण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, हरितालिका हे व्रत केल्यामुळे सर्व पापे तसेच कौटुंबिक चिंता दूर होतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्यवृत्त फक्त महिलांसाठी आहे. हरतालिकेचा उपवास हिंदू धर्मातील सर्वात मोठा उपवास मानला जातो. निर्जला एकादशी प्रमाणे या हरितालिका व्रताच्या दिवशी सुद्धा कठोर उपवास करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो.

     हरितालिकेचे व्रत सर्वप्रथम देवी पार्वतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी केले होते. त्यामुळे हे व्रत खास मानले जाते. तिच्यावर भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते, असे देखील सांगितले जाते. हे व्रत करत असताना, देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता, म्हणून सर्व स्त्रिया देखील निर्जळी उपवास करतात.

            हरतालिका व्रताचे वैशिष्ट्य(Hartalika Teej 2023 Marathi) –

     हे व्रत माता-पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी केले होते. हे व्रत तीने घनदाट अरण्यात केले होते त्यामुळे या अरण्यामध्ये, निसर्गामधील जी काही फळे, फुले, पाने असतील त्या सर्वांचा उपयोग या पूजेसाठी केला होता. तसेच खाण्यासाठी या अरण्यातील फळांचा वापर केला होता. म्हणून हे व्रत करताना निसर्गातील फुले फळे पानांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्याचप्रमाणे हा उपवास फलाहार खाऊन केला जातो.

             हरतालिका का साजरी करतात? –

     माता पार्वतीने भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले. माता-पार्वतीप्रमाणे आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी भारतातील कुमारिका करतात, त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्यावरती असलेली सद्भावना प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतातील सुहासिनी हे व्रत कडक उपवास करून करतात. केल्यामुळे माता पार्वती आणि भगवान शंकर यांची कृपादृष्टी लाभते असे समजले जाते. तसेच घरात सुख, शांती, समाधान लाभते असेही सांगितले जाते. म्हणून हे व्रत दरवर्षी भारतातील कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया मोठ्या भक्ती भावाने कडक उपवास करून करतात.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================