हरितालिका-माहिती-10

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:19:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

             हरतालिकेच्या दिवशी दान करावयाच्या वस्तू –

     या दिवशी खालील गोष्टी दान केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समाधान लाभते. तसेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची कृपादृष्टी आपल्यावर राहते.

तांदूळ – तांदूळ दान करणे हे अतिशय शुभ समजले जाते. यामुळे शुक्र ग्रहाशी संबंधित असलेले सगळे दोष दूर होऊन कुटुंबात सुख शांती नांदते.

गहू – गहूचे दान करणे सोन्याचे दान करण्यासारखे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गव्हाचे दान केल्यामुळे पुण्य मिळते. आपल्याकडे गहू उपलब्ध नसतील, तर तुम्ही गव्हाचे पीठही दान करू शकता.

गुळ – या दिवशी गुळाचे दान केल्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते. तसेच यामुळे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या देखील दूर होतात.

वस्त्र – या दिवशी गरीब लोकांना वस्त्रदान केल्यामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचे वरदान देतात.

फळे – विवाहित स्त्रियांनी या दिवशी फळांचे दान केले तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते.

             हरतालिका व्रताच्या दिवशी काय करावे?--

सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.

पूजेची संपूर्ण तयारी करावी.

उपवास करणाऱ्या स्त्रियांनी, निर्जळी उपवास करावा.

उपवास करणाऱ्या स्त्रियांनी, या रात्री भगवान शंकराच्या मंत्रांचा जप करत, भजन कीर्तन करत, रात्र जागवावी, त्यामुळे लवकर इच्छित फळ मिळते.

या दिवशी घरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न ठेवावे.

            हरतालिका व्रताच्या दिवशी काय करू नये?--

कडक उपवास असल्यामुळे, या दिवशी इतर उपवासाप्रमाणे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.

आंघोळ केल्या शिवाय पूजन करू नये.

या दिवशी घरात कोणताही कलह करू नये.

हे व्रत गर्भवती महिला करत असतील तर. त्यांनी निर्जळी उपवास करू नये.

हरितालिका व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात. त्यामुळे या दिवशी घरामध्ये कोणताही मांसाहारी पदार्थ तसेच मद्यपान करू नये.

घरातील इतर लोकांनी शाकाहारी भोजनाचा स्वाद घ्यावा. मांसाहार करू नये.

           हरतालिका कधी आहे? शुभ मुहूर्त –

हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. यावर्षी 18 सप्टेंबर 2023 सोमवार या दिवशी आहे.

शुभ मुहूर्त – सकाळी ०६.०७ पासून ते सकाळी ०८.३४ मिनिटापर्यंत आहे.

                       हरतालिका पूजा माहिती –

           हरतालिका पूजा साहित्य मराठी –

पांढरी फुले, केळीचे पान, आपल्या आजूबाजूला असलेली सर्व प्रकारची पाने, फळे आणि फुले, बेल पत्र, लाल वस्त्र, पांढरी वस्त्रे, विडा, शमी पत्र, आंब्याची पानं, श्रीफळ, धोतरा, तुळशी, नाडापुडी, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, बिंदी, कुंकु, सिंदूर, इत्यादी. हळदकुंकू, ताम्हण, पळी, पंचपात्र, अष्टगंध, समई, गुलाल, तूप, निरांजन, तेल, हरतालिकेची मूर्ती, शिवलिंग, दिवा, कापूर, अक्षता, अबीर, गणेशपूजन, चंदन, शहाळी, केळी, कलश. पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================