हरितालिका-माहिती-11

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:20:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "हरितालिका"
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

           हरतालिका तीज व्रत कथा पूजाविधी मराठी--

प्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी.

नंतर पूजेची सगळी तयारी करून घ्यावी आणि पूजा साहित्य मांडून घ्यावे.

सर्वप्रथम एक पाट घ्यावा.

पाटाच्या बाजूने रांगोळी काढावी. त्यानंतर पाटावर अक्षता ठेवून हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना करावी. तसेच समोर शिवलिंग ठेवावे.

बाजूला समय पेटवून घ्यावी. पाटावर विडा ठेवावा.

त्यानंतर आधी गणेश पूजन करून घ्यावे.

सुरुवातीला हरितालिकेच्या मूर्तींना हळद-कुंकू आणि अक्षता वाहून घ्यावी.

त्यानंतर फुले अर्पण करावीत.

शिवलिंगाला पांढरे वस्त्र वहावे तसेच हरितालिकेच्या मूर्तींना लाल वस्त्र वहावीत.

शिवलिंगला अष्टगंध, चंदन लावून घ्यावे.

यानंतर हरितालिकेच्या मूर्तींना फुलांचा गजरा माळावा आणि नाडापुडी अर्पण करावी.

शिवलिंगाला सगळ्या प्रकारच्या झाडांची पत्री वहावी, तसेच हरितालिकेला फुले वाहावी.

यानंतर निरंजन आणि अगरबत्तीने हरितालिकेला आणि शिवलिंगाला ओवाळावे.

शहाळे आणि केळी यांचा नैवेद्य दाखवून हरितालिकेची कथा वाचावी.

हरतालिकेची आरती करावी.

               पूजेची सांगता –

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.

पूजा साहित्य जमवून, मांडून घ्यावे.

पुन्हा हरितालिका आणि शिवलिंगाची पूजा करून घ्यावी.

त्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.

त्यानंतर हरितालिकेचा खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

देवीला प्रार्थना करून, पूजेमध्ये काही चूक झाल्यास, तशी क्षमा मागावी.

त्यानंतर पुन्हा उत्तर पूजेची अक्षता वाहून, हरितालिका आणि शिवलिंग वरील निर्माल्य बाजूला करून घ्यावे.

यानंतर हरितालिकेचे आणि शिवलिंगाचे पाण्यामध्ये विसर्जन करावे.

पूजेच्या निर्मल्याचे देखील विसर्जन करावे.

यानंतर सगळ्यांना खिचडीचा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा.

               हरतालिका पूजेचे नियम –

स्वच्छ आंघोळ करून पूजा करून घ्यावी.

पूजा झाल्यानंतर फलाहार करावा त्या आधी करू नये.

इतर उपवासाप्रमाणे कोणतेही पदार्थ या उपवासाला खाऊ नयेत.

हा उपवास रात्री सोडू नये. दुसऱ्या दिवशी, उत्तर पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा.

हा उपवास शक्यतो निर्जळी करावा.

हा उपवास एकदा सुरू केल्यानंतर सोडता येत नाही. तसेच हा उपवास काही कारणास्तव सुटला तर पुन्हा धरू शकत नाही.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीझटका.कॉम)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================