हरितालिका-शुभेच्छा संदेश-1

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:43:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     चांगला पती मिळावा म्हणून कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने देखील हे व्रत केले होते. या व्रतामुळेच त्यांना भगवान शंकरासारखा भोळा पती मिळाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी हरतालिका येते. याला हिंदीमध्ये तिज असे देखील म्हणतात. तर आपण याला 'हरताळका' (Hartalika Marathi) असे संबोधतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरताळका येते. हरताळकेचे हे व्रत करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि हरतालिका पूजा मराठी ही वेगवेगळी आहे.

           हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली
व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा.

हरतालिकाचा हा सण...
तुमच्या जीवनात "नव चैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो
व तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिके ला प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!

आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख,
शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो,
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!

माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या
उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिकेचे व्रत करुन
तुमच्या आयुष्यात येवो
आनंदी आनंद हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवेडा.इन)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================