हरितालिका-शुभेच्छा संदेश-26

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 07:27:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     श्रावण महिना संपता संपता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. गणपती बाप्पांचं आगमन आता अवघे काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवाच्या आधीचा हरतालिका हा सण  देखील शास्त्रानुसार फारच महत्त्वाचा असतो.

     भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार इच्छित वरप्राप्ती आणि अखंड सौभाग्यासाठी कुमारिका हे व्रत करतात .तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती अशी अख्यायिका आहे.

     हरतालिकेच्या या पवित्र दिनी आपल्या सख्यांना काही कोट्स पाठवूनही या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करु शकता. जाणून घेऊया हरतालिका कोट्स (Hartalika Quotes In Marathi)--

          हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
सण सौभाग्याचा

पतीवरील प्रेमाचा

हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


आई पार्वती आणि शंकर देवा चा

दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख,

शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो,

अशी माझी देवा जवळ प्रार्थना.

हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!


पतीला मिळावे दीर्घायुष्य

म्हणून करावे हरतालिका

तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डिजिटल टेक्नो डायरी.कॉम)
                 --------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================