श्रीगणेश चतुर्थी-माहिती-3

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 10:39:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर महत्त्वाची माहिती.

     भारतात Ganesh chaturthi 2023 म्हणजेच ganpati 2023 हा उत्सव खूप भक्तिभावाने आणि आनंदाने तसेच उत्सवाने साजरी केला जातो. खास करून महाराष्ट्रात , आणि कर्नाटकात खूप मोठ्या प्रमाणात साजरी होतो .

     दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण हा सण खूप आनंदाने गणेश भक्त साजरी करतील.

=========================================
Post Contents  hide--

1. गणपती कधी बसणार आहे 2023 ? गणपती स्थापना 2023 | ganpati 2023 date
2. why lokmanya tilak start ganesh utsav | लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव का सुरू केला ? | ganesh chaturthi
3. अनंत चतुर्दशी । गणपती विसर्जन मिरवणूक 2023 | anant chaturdashi 2023
4. FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
4.1. Q1: गणपती 2023 कधी साजरा केला जातो? | when is ganpati in 2023 ?
4.2. Q2: गणपती 2023 किती काळ राहतो?
4.3. Q3: बिगर हिंदू 2023 च्या गणपती उत्सवात सहभागी होऊ शकतात का ?
4.4. Q4: गणपती म्हणजे काय ? | What is Ganpati?
4.5. Q5: गणेश उंदरावर का बसतो? | Why Ganesha sits on a mouse?
4.6. Q6: गणेश चतुर्थी 2023 ची सुरुवात आणि समाप्ती तारीख | ganesh chaturthi 2023 start and end date
=========================================

     ganpati 2023 date (ganesh chaturthi-jayanti ) 2023 ह्या वर्षी ganesh jayanti date 19 सप्टेंबर , वार – मंगळवार ह्या दिवशी आहे. आणि त्या नंतर 28 सप्टेंबर, वार गुरुवार 2023 ला ganesh visarjan म्हणजे अनंत चतुर्थी (विसर्जन) anant chaturdashi आहे .

     गणेश जयंती हा उत्सव साजरी करण्यासाठी शहरातील मोठ-मोठे मंडळे असतात . हे मंडळे ganesh jayanti पासून ते विसर्जन करण्या पर्यंत सर्वी जबाबदारी ह्या मंडळांवर असते . शहरातील चौकात गणेश मंडळ हे गणपतीच्या मोठं -मोठ्या मुर्त्या स्थापन करातात . त्याच बरोबर सर्वसामान्य लोकांच्या घरात देखील गणपती स्थापना होते.

     घरातील गणपती हा खासकरून छोट्या मूर्तीचा असतो . आणि पांडाल मधील म्हणजेच मंडळातील गणपती बाप्पा यांची मूर्ती हि मोठी असते

         why lokmanya tilak start ganesh utsav | लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव का सुरू केला ? | ganesh chaturthi--

     १८९४ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विंचूरकर वाड्यात म्हणजेच त्यांच्या राहत्या घरी प्रथम गणपती बसवला. आणि त्या नंतर पुण्यात १०० हुन जास्त ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवले गेले .

     टिळकांनी गणेशउत्सवाला खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य व सामाजिक व्यापक रूप देण्याचे काम केले. खरतर टिळकांनी शिवजयंती आणि गणेशउत्सव साजरी करण्यामागे त्यांचा विचार ,उद्देश्य असा होता कि तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये राष्ट्र प्रेम जागृत व्हावे . आणि लोकमान्य टिळक राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे यासाठीच प्रयत्न करत होते .

     त्याच बरोबर टिळक हे या उत्सवात राष्टवादी चळवळ आणि घोषणेबाजी म्हणजेच घोषणा देखील करत . लोकमान्य टिळक ब्रिटिशांना चकवा देण्यासाठी ganesh festival चा उपयोग करीत असे .

     आणि ह्या त्यांच्या चळवळीची व घोषणेची भनक इंग्रजांना त्यांनी कितीतरी वर्ष लागू दिली नव्हती . लोकमान्य टिळकांच्या हे चांगलेच लक्षात आले होते कि हिंदू धर्मातील लोक गणपतीला खूप महत्व देतात . आणि त्याचं बरोबर बऱ्याच जातीयांमध्ये ही गणेश जयंती साजरी केली जाते .

     मग काय टिळकांनी ठरवलेच याचाच फायदा घेऊन आपण राष्ट्रवादी चळवळीला भर देऊ आणि त्याचा बरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपली जाईल . या उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील आणि याचा उपयोग घोषणा आणि चळवळीसाठी करून घेता येईल याच उद्देशाने lokmanya tilak started ganesh chaturthi ह्या उत्सवाची निर्मिती केली होती .

--By-poonam m.
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================