श्रीगणेश चतुर्थी-निबंध-7

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:13:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर निबंध.

             गणेश उत्सव निबंध--

     गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे. हिंदू धर्मीयांचा गणेश उत्सव आवडता सण आहे . हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव . गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक सण आहे. हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व शुभकार्यात सर्व प्रथम गणपतीचे पूजन केले जाते . शिवपार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते . गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस म्हणजेच इंग्रजी कालगणनेप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होते व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो . घराघरात गणपतीचे लहान मूर्ती आणली जाते आणि अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा केली जाते .

     गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप मखर पताका याची तयारी केली जाते . घरातील लहान थोर अगदी उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात गणेशाला घरी आणतात . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणत सर्व लोक लहान मुले गणपती चा जयघोष करतात . गणेशाला दूर्वा जास्वंदीचे फूल केवडा लाल फुले वाहून गणपतीची पूजा करतात . व आरती केली जाते. तसेच मोदक ,खीर ,लाडू इत्यादी पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून आरती करतात. व सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला जातो. घराघरांमध्ये गणपतीची सुंदर आरास केली जाते.

     त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे ही आकर्षक देखावे करतात व भारतात गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरीचे आगमन होते . गौरीच्या दिवशी दिवशी सर्व स्त्रिया हळदी कुंकू चा कार्यक्रम करतात . गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये मंडळा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . ऐतिहासिक, पौराणिक ,सामाजिक पोवाडे ,लोकगीते असे विविध दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. काही लोक दीड दिवसांनी काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते . अनंत चतुर्थी हा गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असतो .

--by Pritam Sansare
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान जेनिक्स.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================