श्रीगणेश चतुर्थी-निबंध-8

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:14:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर निबंध.

     या दिवशी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन मिरवणूक काढून वाजत-गाजत केले जाते.अनंत चतुर्थीला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणपती बाप्पाचे भावुकपणे विसर्जन होते . लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा गणेशोत्सव भारत देशात ,देशा बाहेर कोणती जात, पंथ, धर्म न मानता साजरा केला जातो. 1892 झाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली. लोकांनी एकत्र यावे आणि एकोपा आणि आनंदाने हा सण साजरा करावा हा त्यामागचा हेतू होता .

     भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले . लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हाही उद्देश होता . त्या अनुषंगाने कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असत . आजही ही प्रथा चालू ठेवणारी काही गणेशोत्सव मंडळे आहेत . परंतु त्या मध्ये वाढ व्हावी. वकृत्व स्पर्धा ,गायन स्पर्धा , क्रीडा स्पर्धा ,लेखक ,साहित्य, कवी ,नाटककार यांच्या भाषण कलागुणांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम या काळात सादर व्हावे.

     यातून नवीन पिढीला नक्कीच योग्य दिशा मिळेल. गणेशोत्सवातील देखाव्यांवर कमीत कमी खर्च करून ते सामाजिक जाणीव जागृती या विषयांवर प्रकाश टाकणारे विविध उपक्रम गणेश मंडळांनी राबवावेत . लोकमान्य टिळकांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. विविध प्रकारच्या जाहिरातबाजी व पोस्टरबाजी वर बंदी आणायला हवी . शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन मिरवणूक झाली पाहिजे. मूर्तीचे रंग पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होते तसेच शाडूच्या मूर्ती वापरण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे .

     आणि आपण प्रदूषण मुक्त पर्यावरण आदी उत्सव साजरे केले पाहिजेत. विसर्जनाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा . समाजाला योग्य दिशा देण्याचे काम गणेश मंडळांनी करावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने झटावे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला गेला तर नक्कीच गणेशोत्सवाचे महत्त्व आणखी वाढेल .

--by Pritam Sansare
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान जेनिक्स.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================