श्रीगणेश चतुर्थी-हार्दिक शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 02:52:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीगणेश चतुर्थी"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थी कविता.

        गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा--

=========================================
तव मातेचे आत्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत, सर्वांना सुख,समृध्दी, ऎश्वर्य,
शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

गणराया तुझ्या येण्याने
सुख,समृध्दी,शांती,आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशीर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टडी लेक्सा.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================