ऋषीपंचमी-माहिती-2

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:13:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "ऋषीपंचमी"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

             या गोष्टी दान करा--

     या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दान करावे. असे म्हटले जाते की, दान केल्याने उपवासाचा परिणाम लवकर दिसून येतो. कोणत्याही ब्राह्मणाला साखर, तूप, केळी यासारख्या वस्तू दान कराव्यात. आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या ऐपतीनुसार तुम्ही दक्षिणाही देऊ शकता.

           ऋषीपंचमीच्या महत्त्वाच्या गोष्टी--

या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये.

उपवास आणि उपासना करताना संयम ठेवून ध्यानधारणा करावी.

या दिवशी साखर, तूप, केळी यासारख्या वस्तूंचे दान करू शकता. दक्षिणाही देऊ शकतात. तसेच अन्नदानही करू शकता.

ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करणे अतिशय शुभ असे मानले जाते.

या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये.

या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान, धूम्रपान यापासून दूर राहावे.

पूजेच्या वेळी ताजी फुले आणि फळे वापरावीत.

पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करावे.

        ऋषीपंचमी 2023 कधी आहे ? (Rishi panchami 2023 Muhurat)--

यावर्षी ऋषीपंचमी २०२३ बुधवार २० सप्टेंबर २०२३ बुधवार या दिवशी साजरी होणार आहे.

           ऋषी पंचमी पूजेच्या वेळा--

सकाळी ११.०१ ते दुपारी ०१.२८ पर्यंत
कालावधी ०२ तास २७ मिनिटे

ऋषी पंचमी तिथी १९ सप्टेंबर २०२३ दुपारी ०१.४३ वाजता सुरू.
ऋषी पंचमी तिथी २० सप्टेंबर २०२३ दुपारी ०२.१६ वाजता समाप्त.

                     ऋषी पंचमी पुजा--

         ऋषीपंचमी 2023 साठी पुजा साहित्य--

फुले, फळे, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपारी, सुटे पैसे, ताम्हण, पळी, पंचपात्र, निरांजन, माचिस, कापूस, कापूर, धूप, मातीचा दिवा, केळीची पाने, नारळ, मातीचा कलश, पंचामृत, तांदुळ, दुध, दही, तुप, हळद, लवंग, विलायची, आंब्याची पाने, पीठ, किशमिश, काजु आणि सात प्रकारचे नैवैद्य, दहा बदाम, केळी आठ, गायीचे शेण, गोमुत्र, गाईचे दूध.

           ऋषीपंचमी 2023 पूजाविधी--

या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
पूजेचे सर्व साहित्य गोळा करावे.

यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यावी, त्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यावी.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================