ऋषीपंचमी-माहिती-3

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:15:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "ऋषीपंचमी"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

     ज्या ठिकाणी पूजा करावयाची आहे, त्या ठिकाणी हळदीने एक चौरस तयार करून घ्या. त्यावर सात ऋषींची स्थापना करावी. –

           ते सात ऋषी कोण होते ते खालील प्रमाणे--

१. वशिष्ठ ऋषी-
राजा दशरथ यांच्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार पुत्रांचे ते गुरु होते. भगवान ब्रह्मा यांच्यामुळे त्यांचा जन्म झाला होता.

२. अगस्त्य ऋषी-
सात ऋषींमध्ये यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे.

३. अत्रि ऋषी-
अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसया असे होते. भगवान राम आणि देवी सीता यांना ज्यावेळी १४ वर्षांचा वनवास झाला होता, त्यावेळी ते अत्री ऋषींच्या आश्रमात राहिले होते.

४. भृगु ऋषी-
या सप्त ऋषींमध्ये भृगु ऋषींचे देखील महत्त्वपूर्ण स्थान आहे. सकाळी लवकर उठल्यावर या ऋषींच्या नावाचा जप करावा.

५. विश्वामित्र ऋषी-
भगवान राम आणि लक्ष्मण यांचे गुरु म्हणून विश्वामित्र ऋषी यांना ओळखले जाते. त्यांनी गायत्री मंत्र लिहिला.

६. द्रोणाचार्य ऋषी-
कौरव आणि पांडवांचे गुरु म्हणून या ऋषींना ओळखले जाते.

७. कश्यप ऋषी-
कश्यप ऋषींनी कश्यप गोत्राची निर्मिती केली होती.

यानंतर सप्तऋषींना जानवे घालावे.

यानंतर या सात ऋषींची हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर त्यांना फुले अर्पण करावे.

निरांजनाने आणि कापुराने घंटा वाजवून, ओवाळून घ्यावे. तसेच अगरबत्तीने देखील ओवाळावे.

संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.

पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.

त्यांना फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा.

तसेच सप्तऋषींची व्रतकथा वाचावी.

या व्रताची पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तशी क्षमा मागून प्रार्थना करावी.

आरती करून प्रसादाचे वाटप करावे.

या दिवशी केला जाणारा उपवास हा निर्जळी किंवा फलाहार करून करावा.

उत्तर पूजेच्या अक्षता वाहून विधीवत सप्त ऋषींच्या मूर्तींचे विसर्जन करावे.

हे व्रत सात वर्ष पूर्ण केल्यावर आणि उपवास केल्यावर आठव्या वर्षी मातीच्या सात ऋषींच्या सात मूर्ती बनवाव्या.

त्यामध्ये कोणत्याही वनस्पतींच्या बिया टाकाव्या.

त्यानंतर कलशाची स्थापना करून यथासांग पूजा करावी.

सात ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे.

जेवण झाल्यानंतर त्या मूर्ती एका भांड्यात ठेवा. नंतर त्यांचे विसर्जन करावे. त्यातील बियांमुळे झाडे तयार होऊन ऋषींच्या आठवणीने ती आपल्या आजूबाजूला राहतील.

             ऋषी पंचमी मंत्र –

'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः.

जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥

दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः'॥

     ऋषी पंचमीला या ऋषी पंचमी मंत्र जप केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. घरात सुख-समृद्धी नांदते. विशेषत: महिलांना ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद मिळतो.

         ऋषीपंचमीचे महत्त्व (Importance Of Rishi Panchami Vrat 2023)--

     असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. असे देखील म्हटले जाते. ऋषीपंचमीचे व्रत केल्यास घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================